नवी दिल्ली | आपल्या वडिलांच्या संपत्तीत मुलाप्रमाणे मुलीलाही वाटा मिळावा या मुद्द्यावर बराच वाद सुरू होता. पण, आता अखेर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर आपला ऐतिहासिक निर्णय दिला आहे. यापुढे वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलीला समान वाटा मिळणार असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे. आपल्या पित्याच्या मालमत्तेत हिंदू स्त्रियांना भावा प्रमाणे समान वाटा मिळेल, असे २००५ साली अधिनियमित केले गेले होते. त्यानुसार, मुलगा व मुलगी दोघांनाही त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेवर समान हक्क मिळतील. परंतु, हा कायदा २००५ पूर्वी वडिलांचा मृत्यू झाला असेल त्यांना याचा लाभ मिळेल की नाही हे स्पष्ट नव्हते.
सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना २००५ मधील कायद्यातील सुधारणांमुळे मुलींना संपत्तीत समान हक्क मिळण्यात अडथळा निर्माण होईल हा दावा फेटाळला आहे. कायद्यात सुधारणा करण्यात आल्यानंतर म्हणजेच २००५ नंतर मुलींचा जन्म झाला असेल तरी त्यांना या कायद्यांतर्गत संपत्तीत समान हक्क मिळणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायमूर्ती अरुण मिश्रा, एस अब्दुल नजीर आणि एम आर शाह यांच्या खंडपीसमोर ही सुनावणी पार पडली. संपत्तीत मुलगा आणि मुलगी दोघांनाही समान हक्क मिळण्यासंबंधी सांगताना न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी म्हटलं की, “मुलाप्रमाणे मुलींनाही संपत्तीत समान हक्क दिला पाहिजे”, असे सांगितले आहे.
Supreme Court said that daughters will have the right over parental property even if the coparcener had died prior to the coming into force of the Hindu Succession (Amendment) Act, 2005. https://t.co/KibABSasCp
— ANI (@ANI) August 11, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.