श्रीनगर | जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी या खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा संबंध असल्याचे देखील म्हटले जात आहे. या परिसराला सध्या घेराव घालण्यात आला असून येथे शोधमोहीम सुरु आहे.
#UPDATE: Two terrorists have been neutralised by security forces in the encounter in Anantnag #JammuAndKashmir https://t.co/zcTj5uUOzP
— ANI (@ANI) May 28, 2019
सुरक्षा दलाच्या जवानांना अनंतनाग जिल्ह्यातील कोकेरनाग परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती मिळत सुरक्षा दलाच्या जवानांनी या संपूर्ण परिसराला घेराव घालत शोधमोहीम सुरु केली. मात्र, या परिसरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला. त्यानंतर झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.