HW News Marathi
देश / विदेश

भिलाई स्टील प्लांटमध्ये स्फोट, ९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

रायपूर | छत्तीसगडमधीळ भिलाई स्टील प्लांटमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटामध्ये ९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू तर १४ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर ८० टक्क्यांहून अधिक भाजले गेले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळपासच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

 

या स्टील कारखान्यामध्ये आज सकाळी (९ ऑक्टोबर) स्फोट झाला होता. या स्टील कारखान्यामध्ये गॅस पाईपलाईनची दुरुस्ती करण्यात येत होती. हा प्रकल्प रायपूरपासून केवळ ३० किमी दूर आहे. या घटनास्थळी ८ ते १० अग्शिमन दलाच्या पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या कारखान्यावर स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाचे नियंत्रण आहे.

भारतीय रेल्वेच्या जागतिक दर्जाच्या रुळांसाठी ‘भिलाई स्टील प्लंट’ हा देशातील एकमेव उत्पादक आणि पुरवठादार आहे. भिलाई स्टील प्लंटच्या आधुनिक आणि विस्तारित प्रकल्पाचे जून महिन्यात पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चाक नादुरुस्त असल्याचे लक्षात येऊनही एक्स्प्रेस तब्बल २०० किमी चालवली

swarit

भगव्या वेशभुषेमुळं माझ्याविषयी गैरसमज – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

News Desk

लष्कराच्या कारवाईत काश्मिरमध्ये तीन दहशतवाद्यांना अटक

News Desk