कर्नाटक | विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. सध्या कर्नाटकात निवडणुकीची रणशिंग फुकले आहे. काँग्रेसने एकूण चार जाहीरनामे प्रसिद्ध केले आहे. ‘आम्ही प्रत्येक जिल्हातील लोकांच्या भावना जाणून घेतल्यानंतर त्यांच्यानुसार जाहीरनामे तयार करण्यात आले’ असल्याचे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले आहे.
‘या जाहीरनाम्यात लिहलेल्या प्रत्येक गोष्टी आम्ही करून दाखवणार. मागच्या जाहीरनाम्यातली 95 टक्के कामे आम्ही करून दाखवली आहेत’, असे म्हणत राहुल गांधी यांनी जनतेला विश्वास देण्याचा प्रयत्न केला आहे.
Mangalore: CM Siddaramaiah, Congress President Rahul Gandhi and other senior party leaders launch Congress party's manifesto for #KarnatakaElections2018. Rahul Gandhi says,'Whatever the manifesto says will be done, 95% of what was mentioned in the last manifesto has been done.' pic.twitter.com/p5J81iRW7R
— ANI (@ANI) April 27, 2018
‘तुम्ही पाहिले असेल भाजपचा जाहीरनामा हा 3-4 लोकांना सोबत घेऊन बनवला जातो. त्यांच्या जाहीरनाम्यात भ्रष्टाचार, रेड्डी ब्रदर्सच्य संकल्पना असतात. भाजपचा जाहीरनामा म्हणजे आरएसएसचा जाहीरनामा असतो’, असे म्हणत राहुल गांधी यांनी भाजपवर निशाना साधला आहे.
This is not a manifesto that has been made by 3 or 4 people in a closed room. This is made by going to every single district and every single community: Congress President @RahulGandhi #NavaKarnatakaManifesto #CongressMathomme pic.twitter.com/g4ED62CpG3
— Congress (@INCIndia) April 27, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.