HW News Marathi
देश / विदेश

दिल्ली हिंसाचार प्रकरणातील दीप सिद्धूला ७ दिवसांची पोलिस कोठडी

नवी दिल्ली | ट्रॅक्टर रॅलीच्या नावाखाली प्रजासत्ताक दिनी दिल्लीत दंगल झाली होती. जमावाने लाल किल्ल्यावर नासधूस केली आणि धार्मिक झेंडा फडकावला. या हिंसेसाठी चिथावणी दिल्याचा ठपका ठेवून दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दीप सिद्धू (३६) याला अटक केली आहे. न्यायदंडाधिकारी (मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट) प्रज्ञा गुप्ता यांनी दीप सिद्धूला ७ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

दिल्ली पोलिसांनी ट्रॅक्टर रॅलीच्या नावाखाली प्रजासत्ताक दिनी झालेल्या दंगलीप्रकरणी ४४ एफआयआर दाखल केल्या आहेत. दंगल प्रकरणात लक्खा सिंह याच्यासह अद्याप काही आरोपींचा शोध सुरू आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सोमवारी रात्री १०.४० वाजता करनाल बायपास परिसरातून अटक केली. प्राथमिक चौकशीनंतर दिल्ली पोलिसांनी काल (९ फेब्रुवारी) संध्याकाळी दीप सिद्धूला न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले आणि त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली.

दिल्लीत प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढण्यासाठी शेतकरी संघटनांनी परवानगी मागितली. दिल्ली पोलिसांनी ट्रॅक्टर रॅलीसाठी वेळ आणि मार्ग निश्चित करुन दिला होता. ट्रॅक्टर रॅली शांततेत पार पडेल, असे लेखी आश्वासन शेतकऱ्यांच्या नेत्यांनी दिले होते. प्रत्यक्षात वेळेच्या आधीच ट्रॅक्टर रॅली सुरू झाली. रॅलीत सहभागी झालेला जमाव ठरलेला रस्ता सोडून वेगवेगळ्या मार्गांनी लाल किल्ल्याच्या दिशेने गेला. रॅलीतील जमावाने दिल्लीच्या रस्त्यांवर तसेच लाल किल्ला परिसरात सार्वजनिक संपत्तीची नासधूस केली. पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून, तलवारी उगारून आणि दडफेक करुन हल्ले केले. यात मोठ्या संख्येने पोलीस जखमी झाले. लाल किल्ल्यावर जमावातील काही सदस्यांनी दीप सिद्धूच्या नेतृत्वात धार्मिक झेंडा फडकावला होता.

कायद्याचा अभ्यास केलेल्या दीप सिद्धूने काही प्रॉडक्शन हाऊससाठी वकील म्हणून काम केले आहे. त्याने निवडक पंजाबी सिनेमांत काम केले आहे. कलाकार असल्यामुळे त्याचा पंजाबमध्ये मोठा चाहता वर्ग आहे. लॉकडाऊन काळात बेकार असताना शेतकरी आंदोलनात सक्रीय झाल्याचा दावा दीप सिद्धू करत आहे. पोलीस चौकशीत दीप सिद्धूने दिल्लीत प्रजासत्ताक दिनी हिंसा करण्यासाठी चिथावणी दिल्याची कबुली दिली. शेतकरी आंदोलनात सक्रीय झाल्यानंतर पहिल्यांदा २८ नोव्हेंबर रोजी दिल्लीत दाखल झाल्याचेही दीप सिद्धूने पोलिसांना सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तीन राज्यात आता काँगेसची सत्ता

News Desk

अल कायदाच्या म्होरक्याची कश्मीरवर आत्मघाती हल्ला करण्याची धमकी

News Desk

इंडोनेशियात आता ज्वालामुखीचा उद्रेक

Gauri Tilekar