HW News Marathi
देश / विदेश

संसदेत चाकू घेऊन प्रवेश करण्याचा अज्ञात व्यक्तीचा प्रयत्न, पोलिसांनी घेतले ताब्यात

नवी दिल्ली | संसद भवनात एका अज्ञात व्यक्ती चाकू घेऊन प्रवेश केल्याची घटना घडली आहे. या अज्ञात व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून हा अज्ञात व्यक्त संसदेच्या गेट क्रमांक १ मधून आत घुसण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी त्याला संसद पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस त्याला संसद भवन स्टेशनला घेऊन गेले असून त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

या अज्ञात व्यक्तीचे नाव सागर इसा असून तो दिल्लीच्या लक्ष्मीनगर परिसरात राहतो. आरोपी राम रहीमच्या समर्थनार्थ घोषणा देत होता. आरोपी स्प्लेंडर बाईकवरुन संसद भवनापर्यंत पोहोचला होता. त्याची बाईकही जप्त केली आहे. मात्र संसद परिसरात घुसण्याचा त्याचा नेमका उद्देश काय होता, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकावरून नवा वादंग

Gauri Tilekar

आता बंगाल उपसागराजवळ चीनकडून बंदर उभारले जाणार

News Desk

खरंतर मी आपणास शरद पवारांचा पंटर, खबऱ्या असा उल्लेख करू शकलो असतो पण…पडळकरांचे राऊतांना पत्र

News Desk