HW News Marathi
Covid-19

दिल्लीकरांना मोफत कोरोना लस मिळणार, मुख्यमंत्री केजरीवालांचा निर्णय

नवी दिल्ली | देशातील कोरोना संकट पाहता दिल्ली सरकारनं १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. लसीकरण वेगाने व्हावं यासाठी दिल्ली सरकारने १.३४ कोटी लसींची ऑर्डर दिली आहे. १ मेपासून दिल्लीत लसीकरण मोठ्या प्रमाणात केलं जाईल असंही मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितलं आहे. मोफत लसीकरणाचा दिल्लीतील सामान्य जनतेला फायदा होईल असंही त्यांनी पुढे सांगितलं आहे.

 

केंद्र, राज्य आणि खासगी रुग्णालयांना एकाच किंमतीत लस मिळाली पाहीजे अशी आग्रही मागणी त्यांनी केली. लस निर्मिती करण्य़ाऱ्या कंपन्याचा दावा आहे की, १५० रुपये फायदा होतो.मग वेगवेगळे दर का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. नफा कमवण्यासाठी पूर्ण आयुष्य पडलं आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच केंद्र सरकारने यात दखल घेत दर निश्चित केले पाहीजेत अशी सूचनाही केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाचे IPLवर सावट, BCCI ची आयपीएलचे उर्वरित सामने रद्द करण्याची घोषणा

News Desk

देशातील दररोजच्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात तुलनेने घट…

News Desk

पुण्यात १७ मेनंतर ३ टक्के कंटेनमेंट झोनमधील निर्बंध कायम | पालिका आयुक्त

News Desk