HW News Marathi
देश / विदेश

दिल्ली विधानसभेच्या मतदानाच्या निकालाआधीच भाजपाने स्वीकारली हार?

नवी दिल्ली | दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतमोजणी सुरू असून पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांची आपच सत्तेत येणार असे स्पष्ट दिसून येत आहे. आप सोबत या निवणूकीच्या दुमश्चक्रीत भाजप आणि कॉग्रेसही रांगत आहेत पण त्यांना पिछाडीवर टाकत आप या शर्यतीत सर्वोच्च स्थानावर आहे. निकालाच्या या गोंधळात मात्र भाजपच्या दिल्ली कार्यालयाबाहेरील पोस्टर चर्चेत आले आहे. या पोस्टरवर निकाला आधीच भाजपने पराभव स्विकारला आहे अशा आशयाचे लिखाण केले आहे. त्यामुळे भाजपने खरोखरच आपली शस्त्र खाली टाकत हार मानली का अशा चर्चांना उधाण येत आहे.

भाजपच्या दिल्ली कार्यालयाबाहेर लावलेल्या या पोस्टरवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा फोटो असून त्यावर, ‘विजय से हम अहंकारी नहीं होते और पराजय से हम निराश नहीं होते.’ अशा आशय लिहित अद्याप मतमोजणीची प्रक्रिया पुर्ण होण्याआधीच हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

दरम्यान, दिल्लीतील एकूण ७० विधानसभा जागांपैकी आम आदमी पार्टीला ५१ ते ६५ जागा मिळू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. तर भाजपच्या खात्यात ३ ते १७ जागा तर काँग्रेसला ० ते ३ जागा मिळू शकतात असाही अंदाज लावण्यात आला. एकूण सरासरी पाहता आपला ५८, भाजपला १० आणि काँग्रेसला २ जागा मिळू शकतात अशीही शक्यता वर्तवण्यात आली होती. आता पुन्हा एकदा दिल्लीत आपचेच सरकार येणार का याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“तुम्ही प्रचाराला येऊ नका”, बंगालमधील कॉंग्रेस नेत्याचे शरद पवारांना पत्र

News Desk

मराठमोळ्या निला विखे-पाटील यांची स्वीडनच्या पंतप्रधान सल्लागार पदी निवड

News Desk

देशांतर्गत स्थलांतरित मतदारांसाठी दूरस्थ मतप्रणाली राबविण्याची निवडणूक आयोगाची तयारी

Aprna