नवी दिल्ली | भारताची फुलराणी सायना नेहवालने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सायनाने दिल्लीमधील भाजपच्या मुख्यालयात पक्षप्रवेश केला आहे. सायनाने भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार देखील करणार आहे. जगभरातील उत्कृष्ट बॅडमिंटनपटूंमध्ये सायनाचा समावेश केला जातो. भाजपचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत सायना नेहवालचा भाजपप्रवेश केला आहे.
Delhi: Badminton Player Saina Nehwal and her sister Chandranshu meet BJP Chief JP Nadda after joining the party earlier today. https://t.co/5Ds3pSjFNJ pic.twitter.com/TnTCJ4zQV9
— ANI (@ANI) January 29, 2020
यापूर्वी क्रिकेटपटू गौतम गंभीरने भाजपमध्ये प्रवेश करत पक्षाच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवून जिंकली. तर कुस्तीपटू योगेश्वर दत्त आणि बबिता फोगाट यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. त्यानंतर आता सायनाही भाजपमध्ये प्रवेश करून राजकारणात आपले नशीब आजमावणार आहे. मोदी सरकारने २०१६ मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सायना नेहवालचा सन्मानित केला आहे. याआधी सायनाला अर्जुन पुरस्कार (२००९), राजीव गांधी खेल रत्न (२००९-२०१०), पद्मश्री (२०१०) हे सन्मान प्राप्त झाले आहेत.
सायना नेहवाल २४ आंतराष्ट्रीय बॅडमिंटन टूर्नामेंट जिंकल्या आहेत. २०१५ मध्ये सायना नेहवालला जगातील पहिल्या क्रमांकाच्या बॅडमिंटन खेळाडूचा मान मिळाला होता. सायना ही मुळ हरियाणाची असून ती लहानपणापासून ती हैदराबादमध्ये राहिली आहे. तसेच तिचा पती पारुपल्ली कश्यपही प्रख्यात बॅडमिंटनपटू आहे. सायनाच्या आयुष्यावर लवकरच चित्रपटही येणार आहे. अमोल गुप्ते दिग्दर्शित ‘सायना’ चित्रपटात अभिनेत्री परिणिती चोप्रा मुख्य भूमिका करणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.