नवी दिल्ली | दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज (११ फेब्रुवारी) निश्चित झाला आहे. दिल्लीत पुन्हा एकदा आपची सरकार येणार असल्याचे निश्चित झाले आहे. अरविंद केजरीवाल सलग तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री भूषविण्याची हॅट्रिक करणार आहेत. तर भाजपची पिछेहाट होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी पत्रकार परिषद घेऊन दिल्लीतील भाजपच्या कामगिरीला स्व:ता जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Delhi BJP Chief Manoj Tiwari: Trends indicate that there is a gap between AAP-BJP, there is still time. We are hopeful. Whatever the outcome, being the State Chief I am responsible. #DelhiElectionResults pic.twitter.com/k2G7r0OGCu
— ANI (@ANI) February 11, 2020
मनोज तिवारी म्हणाले की, “दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या जे आकडे सध्या आमच्या हाती आले. त्यानुसार आप आणि भाजपमध्ये तफावत असल्याची माहिती मिळली आहे. मात्र, परिस्थिती बदलण्यास अजूनही वेळ आहे. त्यामुळे आम्ही आशावादी आहोत. दिल्लीत जोकाही निकाल येतील, त्याला दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून मी जबाबदार असल्याचे तिवारींनी पत्रकार परिषदेत म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.