नवी दिल्ली | दिल्ली विधानसभेची निवडणूक शनिवारी (८ फेब्रुवारी) पार पडली होती. यानंतर आज (११ फेब्रुवारी) दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. दिल्लीच्या गादीवर आप, भाजप आणि कॉंग्रेस यापैकी कोण विराजमान होईल हे आज समजणार आहे. दिल्ली विधानसभेसाठी ६२.५९ टक्के मतदान झाल्याची घोषणा निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत केली. मात्र, आयोगाने जाहीर केलेल्या मतदानाच्या टक्केवारीत तफावत असल्याचा आरोप आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेतून केला. दिल्ली निवडणुकीत अरविंद केजरीवाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.
LIVE UPDATES
- दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपला स्पष्ट बहुमत मिळला आहे.
- दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपला ६२ जागा तर भाजपला ९ जागा मिळाल्या आहे.
- दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया विजयी झाले आहे
- आपला ५८ जागांवर आघाडीवर असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली
Delhi Chief Minister Arvind Kejriwal and other AAP leaders at party office. Political Strategist Prashant Kishor also present. AAP is leading on 58 seats as per official EC trends pic.twitter.com/sZ5gR0kmBv
— ANI (@ANI) February 11, 2020
- आप ५६ जागांवर आघाडी असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. दिल्लीत आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत कार्यालयात उपस्थित आहेत.
Delhi Chief Minister Arvind Kejriwal and other AAP leaders at party office. AAP is leading on 56 seats as per official EC trends pic.twitter.com/kGQzGJ6T3Z
— ANI (@ANI) February 11, 2020
- दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया सातव्या फेरीत सुमारे ७५४ मतांनी पिछाडीवर
- ओखला येथून आम आदमी पक्षाचे अमानतुल्ला खान १९४ मतांनी पिछाडीवर, भाजप उमेदवार ब्रह्मसिंह यांनी घेतली आघाडी
- दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया १५ हजार मतांनी पिछाडीवर. त्यांच्याविरोधात भाजपाने रविंदर सिंह नेगी यांना उमेदवारी दिली होती.
Aam Aadmi Party's Manish Sisodia trailing behind BJP's Ravi Negi by 1427 votes, in Patparganj assembly constituency, after third round of counting. https://t.co/L2TMBRtMgs
— ANI (@ANI) February 11, 2020
- आप २२ जागांवर आघाडी तर भाजपच्या वाटेला १४ जागा आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
#UPDATE: Official EC trends: Aam Aadmi Party leading on 22 seats and Bharatiya Janata Party leading on 14 seats. #DelhiElectionResults
— ANI (@ANI) February 11, 2020
- आप ३२ जागांवर आघाडी तर भाजपची १६ जागांवर पुढे
#UPDATE: Official EC trends: Aam Aadmi Party leading on 32 seats and Bharatiya Janata Party leading on 16 seats. #DelhiElectionResults
— ANI (@ANI) February 11, 2020
- चांदनी चाँकमधून काँग्रेसच्या आमदार अलका लांबा मागे
- काँग्रेसने खाते उघडले नाही
- अरविंद केजरीवाल नवी दिल्लीतून ४३८७ मतांनी आघाडीवर
- आप १८ जागांवर आघाडी तर भाजप ११ जागांवर आघाडी घेतली आहे.
#UPDATE: Official EC trends: Aam Aadmi Party leading on 18 seats and Bharatiya Janata Party leading on 11 seats. #DelhiElectionResults https://t.co/JsnFmnluIP
— ANI (@ANI) February 11, 2020
- आपच्या कार्यकर्त्यांचा कार्यालयाबाहेर जल्लोष
- नवी दिल्लीतून अरविंद केजरीवाल २०२६ मतांनी पुढे
- दिल्लीच्या सर्व ७० जागांचे कल हाती; आप ५३, भाजप १६ आणि काँग्रेस १ जागेवर पुढे
- दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि कुटुंबीय निवासस्थानाहून पक्ष कार्यालयाकडे रवाना
- सुरुवातीच्या कलांमध्ये आपची मुसंडी, आप ४० जागांवर आघाडीवर, तर भाजपा १२ मतदारसंघात पुढे
- पोस्टल मतदानात भाजपचे कपिल मिश्रा मॉडेल टाऊन मतदारसंघात पिछाडीवर; आप 33, भाजप 12 जागांवर पुढे
- दिल्ली विधानसभा निवडणुकीचा पहिला कल हाती- आपला ७ जागांवर आघाडी, भाजप ३ जागांवर पुढेसुरुवातीच्या कलांमध्ये अरविंद केजरीवाल यांचा पक्ष आघाडीवर
- दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षा भाजपपेक्षा तिप्पट जागांवर आघाडीवर, आप 33, भाजप 10 जागांवर पुढे
- सुरुवातीच्या कलांमध्ये आप ३२ जागांवर पुढे; भाजपाला १० जागांवर आघाडी
- आजचा दिवस भाजपसाठी चांगला असेल. आज आम्ही सत्तेत येणार आहोत. जर आम्ही 55 जागा जिंकल्या तर आश्चर्य वाटून घेऊ नका – दिल्लीचे भाजप अध्यक्ष मनोज तिवारी
Manoj Tiwari, BJP Delhi Chief: I am not nervous. I am confident that it will be a good day for BJP. We are coming to power in Delhi today. Don't be surprised if we win 55 seats. #DelhiResults pic.twitter.com/3xPHnd6qNf
— ANI (@ANI) February 11, 2020
- पाच वर्षे जनतेची कामे केल्याने आम्हाला विजयाचा विश्वास- मनीष सिसोदिया
Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia: We are confident of a win today because we have worked for people in the last 5 years. https://t.co/kBIW1zRSjH pic.twitter.com/eUuiVKSsk5
— ANI (@ANI) February 11, 2020
- थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.