HW News Marathi
देश / विदेश

आज अरविंद केजरीवाल घेणार पंतप्रधान मोदींची भेट

नवी दिल्ली | विधानसभा निवडणुकीत भाजपला धुळ चारत आपने दणदणीत विजय मिळविला. यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. आता अरविंद केजरीवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (३ मार्च) सकाळी ११ वाजता संसद भवनात भेट घेणार आहेत.

दरम्यान, केजरीवाल यांच्या मोदींच्या भेटीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, दिल्ली हिंसाचारच्या पार्श्वभूमीवर या दोघांची भेट होणार असून भेटी दरम्यान देखील दिल्ली हिंसाचाराचा मुद्दा महत्त्वाचा असणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

नुकतेच केजरीवाल सरकारने सीपीएम नेता कन्हैया कुमार यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यास मंजुरी दिली होती. गेल्या 5 वर्षापासून हे प्रकरण दिल्ली सरकारमुळे अडून होते. मात्र, दिल्ली सरकारने विधानसभा निवडणुकीनंतर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यास परवानगी दिल्याने त्यांच्यावर टीका झाली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#CoronaVirus | पंतप्रधानांनी घोषित केलेला ‘जनता कर्फ्यू’ म्हणजे नक्की काय ?

News Desk

दहशतवादी आणि आपल्या गुप्तचर यंत्रणा एकसमान – माजी राॅ एजंट विनोद साहनी

News Desk

#Amritsar : रावणदहन कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी

Gauri Tilekar