HW News Marathi
देश / विदेश

केजरीवालांनी महिलांच्या सुरक्षेसाठी मेट्रो आणि बसमध्ये प्रवास केला मोफत

नवी दिल्ली | आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत मेट्रो आणि बसेसमध्ये महिलांना मोफत प्रवास सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. केजरीवाल यांनी आज (३ जून) पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाची घोषणा केली.

केजरीवाल यांनी महिलांनामेट्रो व बस प्रवास मोफत करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीत महिलांना असुरक्षित वाटते. हा निर्णय महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. दिल्ली सरकारने दिल्ली मेट्रो आणि डीटीसी बसमध्ये महिलांना मोफत प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महिलांच्या मोफत प्रवासामुळे डीएमआरसीचे होणारे नुकसान दिल्ली सरकार भरुन काढेल, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.

केजरीवाल पुढे असे देखील म्हणाले, दिल्ली सरकार सब्सिडी देत असून याचा खर्च सुद्धा दिल्ली सरकार देणार आहे. बस आणि मेट्रोमध्ये महिलांच्या प्रवासाचे प्रमाण ३३ टक्के आहे. यानुसार दिल्ली सरकारवर प्रतीवर्षी १२०० कोटींचा बोजा पडणार आहे. महिलांना मोफत प्रवास प्रवास देऊन डीएमआरसीच्या होणाऱ्या नुकसानाची भरपाई दिल्ली सरकार करेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकसभेच्या उपाध्यक्षपदावर आमचा नैसर्गिक हक्क !

News Desk

आग्रा किल्ल्यातील ‘दिवाण-ए-आम’ मध्ये यंदा प्रथमच होणार शिवजयंतीचा उत्सव; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र शासनाचे मानले आभार

Aprna

ट्रम्पनंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू ‘या’ गोष्टीसाठी भारताचे मानले आभार

News Desk