नवी दिल्ली। जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात अभिनेत्री दीपिका पादुकोण ही सहभागी झाली. दीपिकाने काल (७ जानेवारी) रात्री ८ वाजताच्या सुमारास जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन त्यांची भेट घेतली. या हल्ल्याच्या विरोधात आंदोलन सहभागी होऊन आपला निषेध नोंदविला. यादरम्यान दीपिकाने माध्यमांशी बोलणे टाळले. या हल्ल्यात विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयशा घोष दीपिकाने भेट घेत तिच्या तब्यतीची विचारपूस केली. यावेळी जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार ‘जय भीम’च्या घोषणा देत होते.
Delhi: Deepika Padukone greets Jawaharlal Nehru University Student Union (JNUSU) President Aishe Ghosh at the university, during protest against #JNUViolence. (earlier visuals) pic.twitter.com/89P9ixwmAh
— ANI (@ANI) January 7, 2020
दीपिका पादुकोणने जेएनयूमधील आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेताच भाजपकडून तिच्यावर टीका सुरू झाली. दीपिकाने तुकडे-तुकडे आणि अफझल गँगचेसमर्थन केले आहे. त्यामुळे तिच्या चित्रपटांवर बहिष्कार घालण्यात यावा, असे आवाहन भाजपचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंह बग्ग यांनी केले. तर अभिनेत्री स्वरा भास्करने दीपिकाचे कौतुक केले. दीपिकाने जेएनयूच्या आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतल्याबद्दल सोशल मीडियावरही परिणाम पाहायला मिळत आहेत. #boycottchhapaak, #JNUFilmPromotion आणि #ISupportDeepika असे दोन हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत आहेत.
RT if you will Boycott Movies of @deepikapadukone for her Support to #TukdeTukdeGang and Afzal Gang pic.twitter.com/LN5rpwjDmT
— Tajinder Pal Singh Bagga (@TajinderBagga) January 7, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.