नवी दिल्ली | देशात कोरोनाचा फैलाव वेगाने होते आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत वैद्यकीय कर्मचारी जीवाची पर्वा न करता लढ देत आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आता देशाचे राष्ट्रपती नामनाथ कोविंद यांची पत्नी सविता कोविंद ‘फर्स्ट लेडी’ही मैदानात उतरल्या आहेत. सविता कोविंद यांनी स्वतःच गरिबांसाठी मास्क शिवत आहेत.
Delhi: First Lady Savita Kovind stitched face masks at Shakti Haat in the President’s Estate. The masks stitched at Shakti Haat are being distributed at various shelter homes of Delhi Urban Shelter Improvement Board (22.04.2020) pic.twitter.com/CwtLvnqht6
— ANI (@ANI) April 22, 2020
प्रेसिडेंट इस्टेट येथील शक्ती हाट येथे सविता कोविंद यांनी त्यांनी स्वतःच्या हाताने मास्क शिवले. सविता कोविंद यांनी शिवण्यात आलेले सर्व मास्क दिल्ली अर्बन शेल्टर इंप्रुव्हमेंट बोर्डाच्या विविध शेल्टर होम्सना वितरित केले जात आहेत. गेल्या २४ तासांत देशामध्ये कोरोनाचे १६४५४ नवे रुग्ण आढळले असून, याच काळात ६८१ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता २१ हजार ३९० झाली असून, त्यापैकी ४२५७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.