नवी दिल्ली | देशातील अनेक राज्यात काल (४ मे) मद्यविक्रीला सुरुवात झाली. यानंतर प्रत्येक राज्यात मद्यप्रेमींनी दुकानाबाहेर लांबच लांब रांग लागल्याचे पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी सोशल डिन्स्टसिंगचे ऐशीतैशी झालेले पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने आजपासून (५ मे) दारू विक्रीवर ७० टक्के कोरोना महारोगराई कर लादण्याचा निर्णय घेतला असून, त्याला ‘स्पेशल कोरोना फी’ असे नाव देण्यात आले आहे.
#WATCH People line up outside a liquor shop in Delhi's Laxmi Nagar. Delhi Government has imposed a "Special Corona Fee" of 70% tax on Maximum Retail Price of the liquor. pic.twitter.com/rRnk1cuPCr
— ANI (@ANI) May 5, 2020
मद्यविक्रीच्या दुकानाबाहेरली गर्दी कमी करण्यासाठी अतिरिक्त ७० टक्के कर लादण्याचा निर्णया घेतला असून दुकानात मद्याचा पुरेसा साठा उपलब्ध झाला पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे नागरिक गरजेपेक्षा जास्त मद्य खरेदी करत आहेत. त्यामुळे मद्यावर अतिरिक्त ७० टक्के कोरोना महारोगराई कर लादण्याचा अहवालात हे सर्व मुद्दे मांडून दिल्ली सरकारला सुपूर्द केला आहे.
दिल्ली रेड झोनमध्ये आहे, तरही काही अटीशर्तीवर मद्यविक्रीला सूट देण्यात आली होती. मात्र, दिल्लीत काही ठिकाणी नियमाची उल्लंघन झाल्याचे दिसून आले. पुन्हा असा प्रकार आढळून आल्यास संबंधित भाग सील करू, असा इशाराच दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले आहे. कामकाजादरम्यान दुकानदारांनाही आपली जबाबदारी समजून घ्यावी लागेल. दुकानाबाहेर सोशल डिन्स्टसिंगचे पालन केले पाहिजे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.