HW News Marathi
देश / विदेश

दिल्ली उच्च न्यायालयाने सज्जन कुमारची याचिका फेटाळली

नवी दिल्ली | दिल्ली उच्च न्यायालयाने १९८४ मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगल प्रकरणातील आरोपी सज्जन कुमारला १७ डिसेंबर रोजी जन्मठेपची शिक्षा सुनावली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने सज्जन कुमारला ३१ डिसेंबरपर्यंत शरण येण्याचा आदेश दिला होता. मात्र, शरण येण्यासाठी एका महिन्याची मुदत वाढवून मिळावी यासाठी सज्जन कुमारने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

दरम्यान, सज्जन कुमार दिल्ली उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती मिळत आहे. “दिल्ली उच्च न्यायालयाच्या या निर्णयाने धक्का बसला आहे. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी वरिष्ठ वकिलांशी चर्चा करत आहे. परंतु, वकील हिवाळी सुट्टीवर गेले असून शरण येण्यासाठी एका महिन्याची मुदतवाढ द्यावी”, अशी मागणी सज्जन कुमारने आपल्या याचिकेत केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तानकडून गझनवी क्षेपणास्त्राची चाचणी, इम्रान खानकडून टीमचे अभिनंदन

News Desk

अटल बिहारी वाजपेयींची प्रकृती गंभीर

News Desk

नोटाबंदीबाबत मोठा खुलासा, आरबीआयने दिला होता सरकारला इशारा

Atul Chavan