HW News Marathi
देश / विदेश

दिल्ली उच्च न्यायालयाकडून ५६ वर्षे जुने ‘नॅशनल हेराल्ड हाऊस’ खाली करण्याचे आदेश

नवी दिल्ली | दिल्ली उच्च न्यायालयाने नॅशनल हेराल्ड हाऊस प्रकरणी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेस पक्षाला ५६ वर्षे जुने असलेले ‘नॅशनल हेराल्ड हाऊस’ खाली करण्याचे आदेश शुक्रवारी (२१ डिसेंबर) दिले आहेत. न्यायालयाकडून नॅशनल हेराल्ड हाऊस खाली करण्यासाठी २ आठवड्यांचा अवधी दिला आहे. त्याचप्रमाणे दिलेल्या वेळेत जर ते खाली करण्यात आले नाही तर त्यावर कारवाई होऊ शकते, असे देखील न्यायालायाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

नॅशनल हेराल्ड हाऊस खाली करण्याबाबतच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी निर्णय दिला आहे. न्या. सुनील गौर यांच्या खंडपीठाने हा निर्णय सुनावला आहे. दरम्यान, एजेएलने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून नॅशनल हेराल्ड हाऊसचा भाडेतत्त्वाचा करार रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान दिले होते. याच प्रकरणाबाबत उच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांचे ऐकून घेतल्यानंतर २२ नोव्हेंबरला आपला निर्णय राखीव ठेवला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Ayodhya : मुख्यमंत्र्यांपाठोपाठ राज ठाकरेंनी केले मोदींचे अभिनंदन

swarit

“तुम्हाला फडणवीसांनी तिकीट कापून वेशीवर का टांगलं याचं चिंतन करा” मिटकरींचा ‘या’ भाजप नेत्यावर घणाघात

News Desk

एएन-३२ विमानातील १३ जवान शहीद

News Desk