HW News Marathi
देश / विदेश

‘शाहीन बाग खेल खत्म’, म्हणत ‘त्या’ तरुणाने आंदोलकांवर केला गोळीबार

नवी दिल्ली | दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आज (३० जानेवारी) नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात गोळीबार झाल्याची घटना घडली. या आंदोलनात गोळीबार करणाऱ्या तरुणाची ओळख पटली असून त्यांचे नाव रामभक्त गोपाल शर्मा असे आहे. गोपालने जामिया परिसरात गोळीबार करण्यापूर्वी त्याने जामियातील मोर्चोतून फेसबुक लाइव्ह केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी तात्काळ ताब्यात घेतले.

आरोपीने मोर्चात पिस्तुल दाखवल्यानंतर शादाब आलम या तरुणाने थांबवण्याच प्रयत्न केला. मात्र, यात शादाब आलमच्या हाताला गोळी लागली. सध्या त्यांच्यावर होली फॅमिली रुग्णालयमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जामिया परिसरात दुपारच्या सुमारास गोपाल येथे पिस्तुल घेऊन दाखल झाला. आणि गोळीबार केली.

 

रामभक्त गोपाल शर्मा याने त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये त्याने ‘आझादी दे रहा हूं’, ‘शाहीन भाग खेल खत्म’ आदी पोस्ट केल्या होत्या. गोळीबार झाल्यानंतर रामभक्त गोपालच्या पोस्टवर अनेकांनी त्यांचे समर्थन केल्याची धक्कादायक बाब समोर आली. यानंतर फेसबुक प्रोफाइल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली. त्यानंतर फेसबुकवरून गोपालचे प्रोफाइल हटवण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘राज्याला ड्रायव्हर नको, लोकांचं हित पाहणारा मुख्यमंत्री हवा’, नारायण राणे यांचं ठाकरेंवर टीकास्त्र

News Desk

“…म्हणून शरद पवारांनी घेतली पंतप्रधानांची भेट”, जयंत पाटीलांनी सांगितलं भेटीचं कारण!

News Desk

भारत-पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यासाठी रशियाने मध्यस्थी करावी

News Desk