नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून कलम ३५ अ आणि ३७० वरून वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आज (५ ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांची सकाळी ९.३० वाजता महत्वाची पार पडली आहे. या बैठकीनंतर शहा राज्यसभेत ११ वाजता आणि लोकसभेत १२ वाजता केंद्र सरकारकडून निवेदन सादर करणार आहेत. शहा निवदेन सादर करण्यासाठी संसदेत दाखल झाले आहे.
Delhi: Union Home Minister Amit Shah arrives at the Parliament. He will speak in Rajya Sabha at 11 am and in Lok Sabha at 12 pm today. pic.twitter.com/odN52wDLIa
— ANI (@ANI) August 5, 2019
या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. या पार्श्वभूमीव विरोधी पक्षातील नेते राज्यसभेत भेटणार आहेत. तर काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी लोकसभा आणि राज्यसभेत स्थगन प्रस्ताव आणणार असल्याची माहिती दिली. दरम्यान श्रीनगरसह जम्मू-काश्मीरमधील अन्य जिल्ह्यात काल (४ ऑगस्ट) कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
Congress leaders Anand Sharma, Ghulam Nabi Azad and Ahmed Patel at the Parliament premises for the meeting of Congress MPs. pic.twitter.com/1jYt4bJqsw
— ANI (@ANI) August 5, 2019
दरम्यान पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांना त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवण्यात आले असून राज्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे काश्मीरमधील सचिवालय, पोलिस मुख्यालय, विमानतळ आणि अन्य संवेदशील ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
Jammu and Kashmir: Latest visuals from various parts of Srinagar where section 144 CrPC has been imposed from midnight 5th August. pic.twitter.com/bFOeHnwh4O
— ANI (@ANI) August 5, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.