HW News Marathi
देश / विदेश

२१ तोफांची सलामी देत तिन्ही सैन्य दलांकडून ट्रम्प यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’

नवी दिल्ली | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दोन दिवसीय भारत दौऱ्याचा आजचा (२५ फेब्रुवारी) दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. ट्रम्प यांची पत्नी मेलानिया यांचे राष्ट्रपती भवनात पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. भारतीय सैन्यदलाकडून ‘गार्ड ऑफ ऑनर’ देखील देण्यात आले आहे. ट्रम्प यांना तिन्ही सैन्य दलाकडून २१ तोफाची सलामी देण्यात आली. दरम्यान, भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. यावेळी ट्रम्प यांच्या स्वागतासाठी उपस्थित असलेल्या भारतीय प्रतिनिधिमंडळात अमित शाह, राजनाथ सिंह, एस जयशंकर, रविशंकर प्रसाद, डॉ. हर्षवर्धन, जिंतेंद्र सिंह आणि हरगीप पूरी उपस्थित होते.

यानंतर ट्रम्पसह पत्नी राष्ट्रपती भवनातून थेट राजघाटावर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीला अभिवादन करत त्यांनी वृक्षरोपण केले. राजघाट येथे व्हिजिटर्स बूकमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संदेश लिहिला आहे. राजघाटनंतर ट्रम्प सकाळी ११.३० वाजता नवी दिल्लीमधील हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान मोदी आणि अमेरकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार आहेत.यात अमेरिका आणि भारत या दोन्ही देशातील दहशतवाद, सुरक्षा आणि व्यवहार यांसारख्या अनेक मुद्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती मिळली आहे.

ट्रम्प यांची पत्नी मेलानिया दिल्ली येथील सरकारी शाळांमधील हॅप्पीनेस क्लासचा दौरा करून मुलांना भेटणार आहे. यानंतर दुपारी तीन वाजता अमेरिकेच राष्ट्रपती यूएस दुतावास येथे जाऊन भारतातील मोठ्या उद्योगपतींना भेटणार आहेत. राष्ट्रपतींना सायंकाळी ७.२५ वाजात ट्रम्प पुन्हा एकदा भेटणार आहेत. रात्री ८ वाजता राष्ट्रपती भवनामध्ये ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प यांच्यासाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर रात्री १० वाजता दोघेही अमेरिकेसाठी रवाना होणार आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

२०१९मध्ये भारतात ११० वाघांचा तर ४९१ बिबट्यांचा मृत्यू, डब्ल्यूपीसीआयचा रिपोर्ट

News Desk

केंद्राने ‘कातडी बचाव’ धोरण स्वीकारू नये ! । अशोक चव्हाण

News Desk

सर्वोच्च न्यायालयाने नागेश्वर राव यांना दिली कामकाज होईपर्यंत थांबण्याची शिक्षा

News Desk