नवी दिल्ली। गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीने सगळीकडे थैमान घातलं आहे. सध्या कोरोनाची लाट आता कुठे ओसरत आहे. त्यातच ‘डेल्टा प्लस’ या विषाणूने डोकं वर काढायला सुरूवात केली होती. तसेच देशात कोरोनाची लाट येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतू कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स अँड इंटेग्रेटिव्ह बायोलॉजीचे प्रमुख संचालक आणि प्राख्यात शास्त्रज्ञ डॉ. अनुराग अग्रवाल यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे.
कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लस या विषाणूमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट येणार नाही, असं डॉ. अनुराग अग्रवाल यांनी सांगितलं आहे. तिसरी लाट येण्याच्या शक्यतेबद्दल सध्या तरी कोणतेही शास्त्रीय पुरावे उपलब्ध नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. डॉ. अनुराग यांनी ‘लोकमत’ला मुलाखत दिली त्यावेळी ते बोलत होते. डेल्टा प्लस विषाणूला शोधण्यासाठी महाराष्ट्र राज्यातून एप्रिल-मे महिन्यापासून कोरोना विषाणूचे सुमारे ३५०० नमुने गोळा करण्यात आले होते. त्यांच्या तपासणीनंतर त्यात डेल्टा प्लस विषाणू सापडले. मात्र त्यांची संख्या खूपच कमी होती.
महाराष्ट्र राज्याने कोरोनामुळे निर्माण झालेली बिकट स्थितीही व्यवस्थितरित्या हाताळली असल्याचं डॉ. अनुराग यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे अजूनही कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे नष्ट झालेली नाही. त्यामुळे बेसावध न राहता, यापुढेही प्रतिबंध आणि नियम पाळणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.