HW News Marathi
देश / विदेश

ईव्हीएमला नकार…बॅलेट पेपरला होकार, राष्ट्रीय जनआंदोलनातर्फे मागणी

धनंजय दळवी, मुंबई | १७ व्या लोकसभेचे २३ मे २०१९ ला लागलेले निकाल हे अत्यंत अविश्वसनीय आहेत. तसेच ते वास्तव परिस्थितीशी अत्यंत विसंगती देखील आहे. ईव्हीएममध्ये हेराफेरी करून लागलेल्या या निकालामुळे भारतीय जनतेचा संपुर्ण लोकशाही निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडाला आहे. निवडणूक आयोगाने व्हीव्हीपॅड पत्रिकेची मतमोजणी करायला साफ नकार देवून या अविश्वासात भरच टाकलेली आहे. प्रत्यक्ष निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर प्रत्येक मतदार संघात झालेली एकूण मतदान आणि निवडून आलेल्या उमेदवारांना मिळालेल्या मतांची बेरीज यातले कोणतेही आकडे जुळत नाहीत. असे वास्तव समोर आले आहे. त्यामूळे “ईव्हीएमला नकार, बॅलेटपेपरला होकार” अशी मागणी राष्ट्रीय जनआंदोलनातर्फे करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर ईव्हीएम मशीन कसे हॅक होऊ शकते, ईव्हीएममध्ये पूर्वनिश्चिती प्रणालीने (pre- program setting) नियंत्रित होऊ शकते, निवडणूक केंद्रात पोहचलेल्या ईव्हीएम मशिनमधील चिप्स कशा प्रकारे बदलल्या जावू शकतात, या आणि अशा प्रकारच्या अनेक बाबी आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानी समोर आणले आहे. त्यामुळे हे निवडून आलेले सरकार “ईव्हीएम सरकार” आहे. याची खात्री पटली आहे. ईव्हीएमबाबतचे हे सर्व घोटाळे जनतेच्या समोर आणावे म्हणून १२ जून रोजी मुंबईतील सर्व जाणकार नागरिक आणि सामाजिक संस्था, संघटनांनी एकत्र येवून राष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे.

ईव्हीएम विरोधी राष्ट्रीय अभियानाला संपुर्ण देशभरातून जनतेच्या उस्फुर्त पाठींबा मिळत आहे. आसाम, मणिपूर, दिल्ली, उ. प्रदेश अशा १५ पेक्षा अधिक राज्यातून या अभियानामध्ये लोक सामील होत आहेत. तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात म्हणून लोक मागणी करत आहेत. देशभरातून ईव्हीएम विरोधात तीव्र संताप व अविश्वास व्यक्त होत आहे. या सर्वांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी ही परिषद घेतली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तिहेरी तलाक विधेयक आज राज्यसभेत सादर होणार

News Desk

दिल्लीत एकीकडे शेतकऱ्यांचे आंदोलन आणि दुसरीकडे सरकारसोबत बैठका सुरुच

News Desk

एफ-१६ या लढाऊ विमानाशी आमचा संबंध नाही | मेजर गफूर

News Desk