HW Marathi
देश / विदेश राजकारण

जेव्हा उपसभापतीच निलंबित खासदारांसाठी चहा घेऊन येतात…

नवी दिल्ली | राज्यसभेत रविवारी २० सप्टेंबरला खासदारांकडून प्रचंड गोंधळ घालण्यात आला. घालण्यात उपसभापतींशी नियमबाह्य वर्तन केल्यामुळे संसदेच्या प्रतिमेला काळिमा फासला गेल्याची चर्चा असतानाच आज (२२ सप्टेंबर) सकाळी मनाला शांत करणारे एक चित्र पाहायला मिळाले. उभसभापतीच निलंबित ८ खासदारांसाठी चहा घेऊन आले. हे चित्र पाहून अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला.राज्यसभेत घातलेल्या गोंधळाप्रकरणी काल (२१ सप्टेंबर) राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी ८ खासदारांवर निलंबनाची कारवाई केली होती. या खासदारांनी अध्यक्षांच्या निर्णयाचा विरोध करत संसदेबाहेर असणाऱ्या गांधी पुतळ्यासमोर आंदोलनाला सुरुवात केली होती. काल रात्रभर हे आंदोलन गांधी पुतळ्यासमोरच झोपले होते.

२० सप्टेंबरला राज्यसभेत २ कृषी विधेयके मंजूर करण्यात आली तेव्हा सभागृहाची सूत्रे उपसभापती हरिवंश नारायण यांच्याकडे होती. त्यांनी कृषी विधेयकांवर आवाजी मतदान घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. तेव्हा विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहाच्या वेलमध्ये येत गोंधळ घातला होता. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी तर उपसभापती हरिवंश नारायण यांच्यासमोरील नियमपुस्तिका फाडली, तसेच माईकही उखाडण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर राज्यसभेतील वातावरण प्रचंड तापले होते.

Related posts

‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ योजनेचा ५६% निधी प्रसिद्धीवर खर्च

News Desk

कोरोनाबाधितांची लूट करणाऱ्या मुंबईतील ३७ खाजगी रुग्णालयांना पालिकेचा दणका 

News Desk

राज्यपालांची भेट घेत भाजप-सेनेकडून एकमेकांवरच दबाव टाकण्याचा प्रयत्न

News Desk