नवी दिल्ली | गृहमंत्री अमित शाह हे बुधवारपासून (२६ जून) जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. गेल्या तब्बल ३० वर्षांच्या इतिहासात प्रथमच देशाचे गृहमंत्री जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर असताना देखील राज्यातील फुटीरवादी नेत्यांनी बंद पुकारला नाही. मात्र, यापूर्वी जेव्हा जेव्हा देशाचे गृहमंत्री जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आले आहेत, तेव्हा तेव्हा राज्यातील फुटीरवादी नेत्यांनी बंद पुकारला होता. मात्र, यावेळी प्रथमच जम्मू-काश्मीरमध्ये बंद पुकारण्यात आलेला नाही.
Srinagar: Union Home Minister Amit Shah and J&K Governor Satya Pal Malik meet representatives of Gujjar and Bakarwal communities pic.twitter.com/dHP1AbjQhX
— ANI (@ANI) June 27, 2019
माजी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या १० सप्टेंबर २०१७ च्या दौऱ्यादरम्यान काश्मीर दौऱ्याच्या वेळीही बंद पुकारण्यात आला होता. मात्र, अमित शहांच्या या दौऱ्याला विरोध दर्शवण्यासाठी कोणत्याही फुटीरवादी नेत्याने बंद पुकारला नाही, कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही हे या दौऱ्याचे विशेष मानले जात आहे. मात्र, यापूर्वीच इतिहास असे सांगतो कि गेल्या ३० वर्षांमध्ये कोणत्याही केंद्राच्या कोणत्याही नेत्याच्या दौऱ्यादरम्यान प्रत्येकवेळी फुटीरवादी नेत्यांनी बंद पुकारला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.