HW Marathi
देश / विदेश राजकारण

साखर उद्योगातील अडचणींसाठी फडणवीसांनी घेतली अमित शहांची भेट

मुंबई | साखर उद्योगातील अडचणीत असलेल्या कारखान्यांच्या कर्ज पुनर्गठनासह विविध प्रश्नांसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन चर्चा केली आहे.
महाराष्ट्रातल्या साखर उद्योगाला अर्थसहाय्य करण्यासंदर्भात दिल्लीत मंत्रीगटाचे प्रमुख अमित शाह आणि भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीवेळी भाजप नेते रणजितसिंह मोहिते पाटील व आमदार राहुल कुल उपस्थित होते. यावर आता सरकार काय पाऊल उचलणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

 

Related posts

भाजप सरकार स्थापन करू शकत नाही !

News Desk

‘नमो अ‍ॅप’च्या माध्यमातून पंतप्रधान मोदी जाणून घेणार लोकांचा कौल

News Desk

मुख्य निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांचा राजीनामा

News Desk