कोलंबो | भारतीय क्रिकेट टीम ने कोलंबो येथे झालेल्या तिरंगी मालिकामध्ये विजय मिळावला होता. या विजया चा शिल्पकार कार्तिकवर बच्चन यांनी कौतुकाचा वर्षाव केला होता. तेव्हा महानायक अमिताभ बच्चन यांनी दिनेश कार्तिकची ट्विटवर माफी मागितली. भारतीय टीम विजयी झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी ट्विट करताना घाईगडबडीत त्यांच्याकडून थोडीशी चूक झाली होती. ही चुकी अमिताभ बच्चन यांना कळताच त्यांनी पुन्हा ट्वीट करून जाहीर माफी मागितली.
T 2747 – INDIA WINS !! T20 in the TRI championship VS BanglaDesh .. what a thriller .. BD had us on the ropes .. and Dinesh Kartik, you beauty .. a brilliant knock .. 24 needed in last 2 overs .. 5 runs and 1 ball left and he hits a 6 ! INCREDIBLE ! CONGRATULATIONS !! pic.twitter.com/je0WyaWzpe
— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 18, 2018
“भारत जिंगला…! भारत तिरंगी मालिका जिंकला आहे. भारत विरोध बांगलादेश असा सामना होता. हा सामना दिनेश कार्तिक यांनी जबरदस्त फंलदाजी केली…शेवटच्या २ षटकात २४ धावाची गरज होती. भारतीय टीमला एका चेंडूत ५ धावाची गरज होती. तेव्हा त्यांनी षटकार मारत… त्यांनी भारतीय टीमला विजय मिळवून दिला..!”
T 2747 – that should read 34 needed in 2 overs .. NOT 24 .. apologies to Dinesh Kartik .. pic.twitter.com/yH6rVjWzpk
— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 18, 2018
- अमिताभ बच्चन यांचे नंतरचे ट्वीट
चूक लक्ष्यात आल्यानंतर “२ षटकार २४ नव्हे तर ३४ धावांची गरज होती. असे लिहून दिनेश कार्तिक यांची जाहीर माफी मागितली.”
दिनेश कार्तिक यांनी अखेरच्या चेंडूत षटकार मारल्यामुळे कोलंबोतील तिरंगी मालिकेत भारताला विजय मिळाला होता. भारताला विजयासाठी पाच धावांची गरज होती. भारतीय क्रिकेट टीमला विजयासाठी १६७ धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यावेळी कार्तिक यांनी षटकार मारुन भारतीय टीमला विजय मिळवून दिला. दिनेश कार्तिक यांनी आठ चेंडूत दोन चौकार आणि तीन षटकरासह नाबाद २८ धावाची विजयी खेळी खेळून भारतीय टीमला विजय मिळाला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.