नवी दिल्ली | “पाकिस्तान हा शेजारी देशांच्या सीमारेषांवर अशांतता पसरवीत कुरघोड्या करीत आहे. तुम्ही कोणत्या दिशेने चालले आहात ? इराणचा अंत पाहू नका”, असा इशारा इराणच्या आयआरजीसी फोर्सचे कमांडर जनरल कासीम सुलेमानी यांनी पाकिस्तान सरकारसह पाकिस्तानी लष्कराला दिला आहे. “पाकिस्तानने जर इराणवर होणाऱ्या दहशतवादी कारवायांना खतपाणी घालणे थांबविले नाही तर इराण देखील पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई करेल”, असे सुलेमानी यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना या आता इराणसाठीही मोठया त्रासदायक ठरत आहेत. मात्र, पाकिस्तानकडून याबाबत कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. त्यामुळे आता इराणही पाकिस्तानच्या सीमारेषेवर भिंत उभारण्याच्या विचारात आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आता इराणकडून पाकिस्तानला सज्जड इशारा देण्यात आला आहे. भारताप्रमाणे इराणने देखील पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
पाकिस्तानमधील दहशतवादाचा खात्मा करण्यासंदर्भात भारत-इराणमध्ये सध्या एकत्रितरित्या चर्चा सुरु आहेत. यासाठी भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले हे इराणच्या दौऱ्यावर देखील जाणार होते. मात्र, याच दरम्यान झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यामुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.