HW News Marathi
देश / विदेश

भगतसिंग यांच्या विषयी तुम्हाला हे माहित आहे का ?

गौरी टिळेकर | भगतसिंग यांचा जन्म १९०७ साली तत्कालीन पंजाब प्रांतातील ल्यालपूर जिल्ह्यातील बंगा गावात झाला. त्यांच्या आईचे नाव विद्यावती व वडिलांचे किशन सिंग होते. ज्यावेळेस त्यांच्या वडिलांची व दोन काकांची तुरुंगातून सुटका झाली, त्याच सुमारास भगतसिंग यांचा जन्म झाला. त्यांच्या कुटुंबातील बरेच सदस्य भारतीय स्वातंत्र्यआंदोलनात सामील झाले होते, तर काही महाराजा रणजितसिंगाच्या सैन्यात होते. त्यांचे काही कुटुंबीय सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय होते. त्याचे आजोबा अर्जुनसिंग हे स्वामी दयानंद सरस्वतींच्या हिंदु सुधारणावादी चळवळीत असून आर्य समाजाचे सदस्य होते. त्याचे वडील व काका हे करतार सिंग साराभा व हर दयाल ह्यांच्या गदर पार्टीचे सदस्य होते.

त्यांच्या वयाच्या इतर शीख मुलांसारखा ते लाहोरच्या खालसा हायस्कूल मध्ये गेले नाहीत. त्यांच्या आजोबांना त्या शाळेतील लोकांची ब्रिटिश सरकारप्रती असलेली निष्ठा मंजूर नव्हती. बारा वर्षे वय असताना जालियनवाला बाग हत्याकांडाच्या नंतर भगतसिंग यांनी ती जागा पाहिली. १४ वर्षे वय असतांना गुरुद्वारा नानकाना साहेब येथे अनेक लोकांना ठार मारण्याविरुद्धच्या आंदोलनात ते सहभागी झाले. गांधीजींनी असहकार चळवळ बंद केल्यानंतर त्यांचा अहींसेच्या मार्गाबद्दल भ्रमनिरास झाल्याने ते सिंग युवा क्रांतिकारी चळवळीमध्ये सामील झाले. ब्रिटीश सरकारचा हिंसक मार्गाने पाडाव करण्यासाठीच्या विचारांचे ते समर्थक होते.

ईटालीच्या गायुसेप माझ्झिनीच्या ‘यंग ईटाली’ नावाच्या गटापासुन प्रेरीत होऊन सिंग यांनी मार्च १९२६ मध्ये ‘नवजवान भारत सभा’ स्थापित केली. ते हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लीकन संघाचे सदस्य झाले, ज्यामध्ये चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिसमील, शहिद अशफाखल्ला खान सारखे दिग्गज होते. नंतर एक वर्षाने, व्यवस्था विवाह टाळण्यासाठी ते घर सोडुन कानपुरला निघुन गेले. एका पत्रात त्यांनी लिहीले आहे. की, ‘माझे जीवन हे सर्वोत्क्रुष्ट कामासाठी मी समर्पीत केले आहे, जे की देशाचे स्वतंत्र्य आहे. त्यामुळे, कोणताच आराम किंवा भौतीक सुख मला आमि़ष करु शकत नाही’.

भगतसिंग यांच्या विषयी तुम्हाला हे माहित आहे का ?

1) भगतसिंग यांना हिंदी, उर्दू, बंगाली, इंग्रजी या भाषांव्यतिरिक्त बांगला भाषा देखील ज्ञात होती. बटुकेशवर दत्त यांनी त्यांना ही शिकवली होती.

2) जेव्हा फाशी दिली गेली तेव्हा भगतसिंग आणि सुखदेव यांचे वय केवळ २३ वर्षे होते.

3) भगतसिंग यांना लग्न करण्याची इच्छा नव्हती. जेव्हा त्यांच्या आई-वडिलांनी भगतसिंग यांच्या लग्नासाठी नियोजन करायला सुरुवात केली तेव्हा ते घर सोडून निघून गेले. “अब तो आझादीही मेरी दुल्हन बनेगी” असे ते म्हणत असत.

4) महाविद्यालयीन जीवनात भगतसिंग यांनी अनेक नाटकांमध्ये अभिनय केला होता. ते चांगले अभिनेते होते. त्याचप्रमाणे त्यांना कुस्तीची देखील आवड होती.

5) भगतसिंग हे स्पष्टवक्ते आणि उत्तम लेखक होते.

6) हिंदू-मुस्लिमांच्या दंगलींमुळे निराश होऊन आपण नास्तिक असल्याची घोषणा त्यांनी केली होती.

7) भगतसिंग यांनी “इन्कलाब जिंदाबाद” चा नारा दिला होता.

8) महात्मा गांधी यांची इच्छा असती तर ते भगतसिंग यांची फाशी रोखू शकले असते. परंतु महात्मा गांधी यांनी तसे केले नाही.

9) भगतसिंग यांना चित्रपट पाहायला आवडत असत. जेव्हा संधी मिळेल तेव्हा राजगुरू आणि यशपाल यांना घेऊन ते चित्रपट पाहण्यास जात असत. भगतसिंग यांना चार्ली चॅप्लिन यांचे चित्रपट आवडत असत. यावरून अनेकदा चंद्रशेखर आझाद भगतसिंग यांच्यावर रागवत असत. भगतसिंग यांना रसगुल्ले खायला देखील आवडत असे.

10) आपल्याला गुन्हेगार ठरवून फाशी न देता, युद्धबंदी म्हणून गोळी घालून मरण द्यावे अशी भगतसिंग यांची इच्छा होती. परंतु ब्रिटिश सरकारने त्यांच्या या इच्छेकडे संपूर्ण दुर्लक्ष केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चारित्र्यहनन करुन आरक्षणाच्या मुळ मुद्याला बगल देता येणार नाही- हार्दिक पटेल

News Desk

तामिळनाडू निवडणुकीपूर्वी शशिकला यांची राजकारण सोडल्याची मोठी घोषणा

News Desk

 ‘मला कर्जबुडव्यांचा पोस्टर बॉय बनवलंय!’- विजय माल्या

News Desk