मुंबई | संपूर्ण देशात कोरोनाच्या विळख्यात अडकलेला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सध्या देशांतर्गत विमानसेवा बंद करण्यात आली आहेत. येत्या २५ मेपासून देशांतर्गत विमानसेवा पुन्हा सुरू करण्यास केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाने परवानगी दिली आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी ट्वीट करून दिली आहे.
Domestic civil aviation operations will recommence in a calibrated manner from Monday 25th May 2020.
All airports & air carriers are being informed to be ready for operations from 25th May.
SOPs for passenger movement are also being separately issued by @MoCA_GoI.
— Hardeep Singh Puri (@HardeepSPuri) May 20, 2020
देशात सोमवारी (२५ मे) विमानसेवा काही अटी आणि शर्थीवर सुरू होणार पुरी यांनी दिली आहे. सगळी विमानतळे आणि विमान कंपन्यांनी यासाठी सज्ज राहावे. प्रवासी वाहतुकीसाठी आवश्यक नियमावली शासनाकडून देण्यात येईल, असे पुरींनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.
देशातील लॉकडाऊनची घोषणा केल्यापासून विमानसेवा बंद आहेत. सध्या देशात लॉकडाऊनचा चौथ्या टप्पा सुरू असून हा टप्पा ३१ मे रोजी संपणार आहे. त्यापूर्वीच देशांतर्गत वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरू करणार आहे. सध्या देशात जगभरात अडकलेल्या भारतीयांना मायदेशात परत आण्यासाठी विमानसेवा सुरू आहे. तर देशातील विविध राज्यात अडकलेल्या मजुरांसाठी श्रमिक विशेष ट्रेन सुरू करण्यात आल्या आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.