नवी दिल्ली | जगात कोरोनाबधितांचा आकडा हा २० लाखांच्या पुढे गेला आहे. कोरोनाच्या सगळ्यात जास्त फटका हा अमेरिकेला बसला आहे. काल (१६ एप्रिल) एका दिवसात अमेरिकेत जवळपास अडीच हजाराहून जास्त लोकांचा जीव गेला. दरम्यान, आत्तापर्यंत जगाच एकाच दिवशी कोरोनामीळे मृत्यू होणाऱ्यांचा हा सगळ्यात जास्त आकडा आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. आणि या काळात नागरिकांनी कोणते नियम पाळावे यासाठी त्यांनी त्या नियमांचे तीन टप्प्यांत विभागणी केली आहे.
COVID-19 lockdown: Trump unveils three-phase plan to reopen United States
Read @ANI story | https://t.co/nRMyzwr1KH pic.twitter.com/DrEwqlGeG7
— ANI Digital (@ani_digital) April 16, 2020
डोनाल्ड ट्रम्प यांची 3 फेजमधील योजना –
पहिली फेज – ज्या राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही नियंत्रणात असेल, तेथील लॉकडाऊन हा शिथिल करण्यात येईल. पम सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे असणार आहे. १० पेक्षा जास्त लोक सोशल डिस्टन्सिंगमध्ये असणार नाहीत.
दुसरी फेज – ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्यांनी घरातच राहावा. अत्यावश्यक कामांसाठीच बाहेर पडावे.
तिसरी फेज – सार्वजनिक ठिकाणी जास्त वेळ थांबू नये.
भारतात जसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळण्यास सांगितले होते. तसेच, अमेरिकाही भारताच्या या बाबीत पावलावर पाऊन ठेवत आहे. ज्या व्यक्तींना कोणताही आजार नाही आहे, त्यांनीही काळजी घेणे हे तितकेच महत्त्वाचे आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.