HW Marathi
देश / विदेश

डोनाल्ड ट्रम्प यांचे पत्रकारांशी पुन्हा वाद

नवी दिल्ली | अमेरिकेत पार पडलेल्या मध्यवर्ती निवडणुकांच्या निकालानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पत्रकारांशी पुन्हा वाद झाले आहेत. मध्यवर्ती निवडणुकांच्या वेळी तुम्ही विस्थापितांचा प्रश्न का पुढे आणला ? असा प्रश्न सीएनएनच्या एका पत्रकाराने विचारल्यानंतर ट्रम्प खूप चिडले. मला देश चालवू द्या तुम्ही सीएनएन चालवा, असे उत्तर ट्रम्प यांनी सीएनएनच्या पत्रकाराला दिले. त्यानंतर त्या पत्रकाराने ट्रम्प यांना दुसरा प्रश्न विचारला.

डोनाल्ड ट्रम्प हे पत्रकार परिषदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी ते मायक्रोफोन काढून थेट निघून गेले. जिम अॅकोस्टा असे या सीएनएनच्या पत्रकाराचे नाव आहे. या वादानंतर सीएनएनच्या पत्रकाराचा प्रेस पास देखील रद्द करण्यात आला होता. प्रसारमाध्यमे ही एखाद्या शत्रूप्रमाणे वागत असल्याची अशी टीका करत ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे असे ट्रम्प यांनी म्हटले.

ट्रम्प काय म्हणाले ?

“तुझ्यासारखा माणूस जेव्हा सीएनएनसारख्या चॅनलमध्ये काम करतो ही त्या कंपनीला लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. तुला कुठे काय बोलायचे ते कळत नाही”, या शब्दात ट्रम्प यांनी सीएनएनच्या पत्रकाराचा अपमान केला.

Related posts

दिवाळीच्या तोंडावर घरगुती गॅस महागला

Gauri Tilekar

एअर स्ट्राईकदरम्यान दहशतवादी तळांवर ३०० मोबाईल अ‍ॅक्टिव्ह, गुप्तचर यंत्रणांची माहिती

News Desk

#PulwamaAttack : हा जम्मू-काश्मीरच्या इतिहासातील जवानांवरील सर्वात मोठा हल्ला

News Desk