HW Marathi
देश / विदेश

अमेरिकेतील मध्यवर्ती निवडणुकांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे वर्चस्व कायम

वॉशिंग्टन | सध्या अमेरिकेत मध्यवर्ती निवडणुकांचे निकाल जाहीर होत असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने अमेरिकी सिनेटमध्ये वर्चस्व अबाधित रहिल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. तर अमेरिकी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हमध्ये डेमॉक्रेटीक पक्षाने पुन्हा मुसंडी मारल्याचे चित्र असून हा ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का समजला जात आहे. ट्रम्प यांना निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर अमेरिकेच्या जनतेचे ट्विट करून आभार मानले आहेत.

अमेरिका संसदेच्या वरिष्ठ सदनातील (सीनेट) १०० पैकी ३५ जागा आणि कनिष्ठ सदनामध्ये (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्ह) ४३५ जागांवर खासदार निवडले जाणार आहेत. यासाठी मंगळवारी (६ नोव्हेंबर)मतदान घेण्यात आले होते. या निवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदा दोन मुस्लिम उमेदवार विजयी झाले असून हे दोन्ही उमेदवार अमेरिकेतील काँग्रेस पक्षाचे सदस्य असल्याची माहिती मिळाली आहे.

 

या निवडणुकांच्या आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, टेक्सासमध्ये टेड क्रूज पुन्हा विजयी झाले आहेत. सीनेटमध्ये ट्रम्प याच्या रिपब्लिकन पक्षाचेच वर्चस्व दिसून येत आहे. परंतु, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हमध्ये डेमॉक्रेटीक पक्षाने मुसंडी मारल्याने वर्चस्वावरून दोन्ही तडजोड करावी लागणार असल्याचे चित्र सध्या स्थितीतून दिसत आहे. सीनेटमध्ये १०० पैकी ९१ जागांवर निकाल जाहीर झाले असून ५० जागांवर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत. तर ४० जागांवर डेमॉक्रेटीक पक्षाचे खासदार आले आहेत.

हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हमध्ये ४३५ जागांपैकी २८७ जागांवरील निकाल जाहीर झाले आहे. ट्रम्प यांच्या पक्षाला आतापर्यंत १४९ जागा तर डेमॉक्रेटीक पक्षाला १३८ जागा मिळाल्या आहेत. तर ट्रम्प यांचा पक्ष केवळ ११ जागांनी पुढे आहे. अद्याप  १४८ जागांचा निकाल जाहीर बाकी  आहे.

Related posts

#Budget2019 : सेन्सेक्स १५१.४४ अंकांनी वधारला

News Desk

गोपाल कृष्ण गांधी उपराष्ट्रपदासाठी विरोधकांचे उमेदवार

News Desk

एटीएम झाले जप्त,पहा…कसलं होतं एटीएम

News Desk