दिल्ली | कोरोना व्हायरसमुळे सध्या अमेरिका अत्यंत बिकट परिस्थितीत आहे,३ लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झालेली आहे.आता या सगळ्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला धमकीवजा इशारा दिला आहे.
भारताने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन (hydroxychloroquine) औषधाच्या निर्यातीवरील बंदी घातली आहे.ही बंदी जर हटवला नाही तर आम्ही प्रत्युत्तर देऊ शकतो. कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी सध्या या औषधाचा वापर केला जात आहे. याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे औषधासाठी विनंती केली आहे.
व्हाईट हाऊसमध्ये मीडियाशी बोलता ट्रम्प म्हणाले की, “भारत आणि अमेरिकेचे संबंध कायमच चांगले राहिलेले आहेत. त्यामुळे अमेरिकेने केलेल्या औषधाच्या ऑर्डरवरील बंदी भारत उठवणार नाही, यासाठी असं होणार नाही. मला कल्पना आहे की भारताने हे औषध इतर देशांमध्ये निर्यात करण्यावर बंदी घातली आहे. मी पंतप्रधान मोदींशी याआधी चर्चा केली होती. आमच्यात चांगला संवाद झाला. भारताचे अमेरिकेसोबत संबंध कायमच चांगले राहिले आहेत.” पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरुन बातचीत झाली. हे औषध अमेरिकेला देण्यासंदर्भात विचार करु, असं नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
मोदींशी झालेल्या संभाषणाबाबतट ट्रम्प म्हणाले की, “रविवारी सकाळी आमच्यात बातचीत झाली होती. भारतावे अमेरिकेला हे औषध दिले तर ठिक आहे आणि जर हे औषध द्यायला नकार दिला तर आम्ही प्रत्युत्तर देऊ ,आम्ही का प्रत्युत्तर देऊ नये ? असे म्हणतं त्यांनी भारताला धमकी दिली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.