वॉशिंग्टन | चीनविरोधात भारतानंतर अमेरिकेने आघाडी उघडली असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी अॅप TikTok आणि Wechat सोबत कोणत्याही प्रकारच्या व्यवहारांवर बंदी आणली आहे. इतकेच नव्हे तर मॉयक्रोसॉफ्ट किंवा अन्य कोणत्याही अमेरिकी कंपनीला ही अॅप खरेदी करता येणार नाहीत. यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत बंद करण्याचे आदेश दिले आहेत. ट्रम्य यांनी यासंबंधी आदेशावर सह्या केल्या आहेत.
ट्रम्प यांनी काल (६ ऑगस्ट) सायंकाळी चिनी अॅप TikTok आणि Wechat अॅप अमेरिकेत ४५ दिवसांच्या आत बंद करण्याचे आदेश दिले आहेत. याआधी सिनेटने एकमताने ही अॅप अमेरिकी अधिकाऱ्यांसाठी बंद करण्यास सहमती दिली होती. ही बंदी गरजेची होती. कारण अविश्वासू अॅपद्वारे अमेरिकन नागरिकांची माहिती गोळा करणे देशाच्या सुरक्षेसाठी धोक्याचे आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले.
US President Donald Trump issues executive order to address the 'threat' posed by TikTok, saying that beginning in 45 days, any transaction subject to US jurisdiction with ByteDance is prohibited: Reuters
(file pic) pic.twitter.com/Uv5bmTfZLy— ANI (@ANI) August 7, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.