HW Marathi
देश / विदेश

डाॅ. मधुकर गायकवाड हे “राष्ट्रीय गौरव अवार्ड”ने सन्मानित

मुंबई | सेंट जाॅर्जेस रूग्णालय अधीक्षक डाॅ.मधुकर गायकवाड यांना “राष्ट्रीय गौरव अवार्ड” या अतिशय प्रतिष्ठित समजल्या जाणार्‍या पुरस्काराने २८ मार्च नवी दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरांवर विलक्षण कामगिरी करणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्तींनाच “राष्ट्रीय गौरव अवार्ड” हा प्रदान करण्यात येतो. यामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, उद्योग, कला, क्रिडा, राजकारण व समाजकारण इत्यादी क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश असतो. आजपर्यंत अतिशय मोजक्या लोकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यात डाॅ. मधुकर गायकवाड यांचा समावेश आहे.

डाॅ. मधुकर गायकवाड यांना आजपर्यंत त्यांनी केलेल्या सेवा कार्याबद्दल अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आजपर्यंत हा पुरस्कार प्राप्त झालेल्या मान्यवर व्यक्तींमध्ये मदर तेरेसा, भारताचे माजी उपराष्ट्रपती श्री बी.डी.जत्ती, ह्दयरोग तज्ञ पद्मविभूषण डाॅ.बि.के.गोयल, पद्मभूषण डाॅ.नरेश त्रेहान, सरोदवादक पद्मविभूषण उस्ताद अमजद अली खान, क्रिकेटर सुनील गावस्कर व सय्यद किरमाणी, ऑलंपिक पदक विजेते अभीनव बिंद्रा व धनराज पिल्लै, श्री डी.वाय.पाटील (माजी राज्यपाल – बिहार), माजी एयर चीफ मार्शल श्री एन.सी.सुरी, माजी चीफ जस्टिस पी.एन. भगवती, इलेक्शन कमीशनर जी.व्ही.जी.कृष्णमुर्ती, डाॅ.रमेश पोखरियाल (माजी मुख्यमंत्री – गोवा), श्री दिनेश ओरायन (स्पिकर – झारखंड ), मुझफ्फर हुसैन (सांसद) अशा निवडक व्यक्तींचा यात समावेश आहे.

Related posts

प्लास्टिक अंड्यानंतर आता रसायनयुक्त अंडी आल्याने खळबळ

News Desk

भारताच्या सर्वात वजनदार जीसॅट-११ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

News Desk

अमेरिकेच्या मदतीने दिल्लीतून दहशतवादी अटकेत

News Desk