HW News Marathi
देश / विदेश

हैदराबादला पावसाने धुतले

हैदराबाद- जोरदार पावसाने हैदराबाद शहराला चांगलेच झोडपले. सोमवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या पावसाने शहरभर पूरस्थिती निर्माण केली. ठिकठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांचे हाला झाले. सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून सुरू झालेला पाऊस पुढे पाच तास सुरुच होता. विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह सुरु झालेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. या पावसात तिघांना आपला जीव गमवावा लागला.

यावेळी ७ सेमी ते १२ सेमी पावसाची नोंद झाली आहे. बंजारा हिल्स येथील सिंगाडीकुंटा भागात भिंत कोसळून एका बालकासह दोघांचा मृत्यू झाला. तर, हुसैनी आलम भागात एकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुजरातमध्ये पतंगाच्या मांज्यामुळे गळा कापला जाऊन ६ जणांचा मृत्यू

News Desk

खताच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान द्या, केंद्र सरकारकडे चंद्रकांत पाटील यांची मागणी

News Desk

ओडिशात ‘तितली’ चक्रीवादळामुळे ५७ जणांचा मृत्यू

swarit