HW News Marathi
देश / विदेश

भय्यूजी महाराजांच्या कन्येने दिला मुखाग्नि, पंचत्वात विलीन

इंदूर | प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज पंचत्वात विलीन झाले आहेत. भय्यूजी यांच्या पार्थिवाला त्यांची कन्या कुहू हिने मुखाग्नि दिली आहे. भय्यूजी यांनी मंगळवारी १२ जून रोजी राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली होती.

भय्यूजी यांचे पार्थिव सकाळी १० ते १ वाजेपर्यंत सुर्योदय आश्रमात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर दुपारी दीड वाजता आश्रमातून मेघदूत मुक्तीधाम स्मशानभूमीपर्यंत भय्यूजी यांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. या अंत्ययात्रेसाठी हजारोच्या संख्येने भय्यूजी यांचे अनुयायी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते.

आत्महत्येपूर्वी भय्यूजी महाराज यांनी सुसाईट नोट लिहिली होती. यात ‘मला आयुष्यातील ताण असह्य झाला असून मी खूप थकलोय. माझ्या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये असे भय्यूजी महाराजांनी सुसाईट नोटमध्ये लिहिले आहे. पोलीस भय्यूजी यांच्या आत्महत्याचा तपास करत आहेत. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी अध्यात्म व सामाजिक कार्यातून निवृत्ती घेतली असल्याची माहिती मिळाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लज्जास्पद सत्य म्हणजे अनेक भारतीय दलित, मुस्लीम, आदिवासींना माणूस समजत नाहीत – राहुल गांधी

News Desk

अमित शहा यांचे पद येणार धोक्यात

News Desk

“सर्वोच्च न्यायालयानेच केंद्र सरकारच्या श्रीमुखात भडकावली”, शिवसेनेचा भाजपवर निशाणा

News Desk