नवी दिल्ली | भारत आणि चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव वाढला होता. चीनच्या सैन्यासोबत भारताची लडाखमधील गलवान खोऱ्यात चकमक झाली. या चकमकीत एक भारतीय अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले आहेत. लडाखमधील सीमावादाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच भारत आणि चीनमधील सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. मात्र, आता पुन्हा दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये गोळीबार झाल्याने सीमेवरील चिंता वाढली आहे. तर १९६५ नंतर पहिल्यांदाच चीनच्या हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाले आहेत.
During de-escalation process in Galwan Valley, a violent face-off took place last night with casualties. The loss of lives on Indian side includes an officer & 2 soldiers. Senior military officials of the two sides are currently meeting at the venue to defuse the situation: Army pic.twitter.com/Z3y9ocQu26
— ANI (@ANI) June 16, 2020
लडाखमध्ये काल (१६ जून) रात्री मागे हटण्यावरून झालेल्या चकमकीत एका अधिकाऱ्यासह तीन जवान शहीद झाले आहेत. लडाखच्या गलवान व्हॅलीमध्ये हा तणाव कसा निवळेल यासाठी चीन आणि भारताचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास चीन आणि भारताचे जवान आमने सामने आले. त्यांच्यामध्ये वाद झाला. यानंतर चीनच्या सैन्याने भारतीय जवानांवर हल्ला केला.
भारत-चीन सीमेवर १९७५ नंतर प्रथमच असा गोळीबार होऊन सैनिकांना मारल्याची घटना घडली आहे. १९७५ नंतर संघर्षात प्रथमच जवानांचा मृत्यू झाला. १९७५ lला भारताचे ४ जवान शहीद झाले होते. १९७५ ला अरुणाचल प्रदेशात संघर्ष उफाळला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.