जकार्ता । इंडोनेशियात पुन्हा एकदा भूकंप आणि त्सुनामीमुळे हाहाकार माजला आहे. शुक्रवार (२८ सप्टेंबर)७.५ रिश्टर स्केलचे भुकंपाचा धक्का बसल्यानंतर काही वेळाने समुद्रात २ मीटर (६.६ फूट) उंचीच्या लाटा रुपी त्सुनामीचाही जोरदार फटका बसला आहे. या प्रलयात आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार मृतांचा आकडा ३८४ वर गेला आहे. मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. भूकंपानंतर पालू शहरातील विमानसेवा बंद करण्यात आली आहे.
Atleast 384 people were killed in the Indonesian island of Sulawesi after powerful twin earthquakes and a Tsunami struck the area
Read @ANI Story | https://t.co/eKuI2BOVtT pic.twitter.com/YZ3ZGm3WMK
— ANI Digital (@ani_digital) September 29, 2018
दरम्यान, इंडोनेशियात गेल्या महिन्यातही भूकंपामुळे भीषण हानी झाली होती. ५ ऑगस्टच्या भूकंपात ४६० लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच यापूर्वी २००४ मध्ये इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर विनाशकारी भूकंप आणि त्सुनामी आली होती. यात संपूर्ण हिंदी महासागर प्रभावित झाला होता. भारताच्या तामिळनाडू किनारपट्टी भागातही या प्रलयाने हाहाकार उडाला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.