नवी दिल्ली | राजस्थानमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण अस्थिर आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरकारमध्ये सध्या राजकीय वर्तुळात गोंधळ सुरू असताना आता आणखी एक नवी बाब समोर आली आहे. अशोक गेहलोत यांच्या भावाच्या कंपनीवर ईडीकडून छापा टाकण्यात आला आहे. कथित खत घोटाळा प्रकरणी ईडीकडून हा छापा टाकण्यात आला आहे. यात अशोक गेहलोत यांचा भाऊ अग्रसेन गेहलोत यांच्या कंपनीचाही समावेश आहे. अग्रसेन यांची मालकी असणाऱ्या सर्व ठिकाणी ईडीकडून छापे टाकले जात आहेत.
Enforcement Directorate is conducting searches at several locations in Rajasthan, West Bengal, Gujarat and Delhi, over fertiliser scam.
Raids being held at the premises of Agrasen Gehlot, brother of Rajasthan CM Ashok Gehlot and at the residence of former MP Badri Ram Jakhar. pic.twitter.com/Gtr4bntjTY
— ANI (@ANI) July 22, 2020
जोधपूरमधील अनुपम कृषी कंपनी अशोक गेहलोत यांचे भाऊ अग्रसेन गेहलोत यांच्या मालकीची आहे. कस्टम विभागाने खटला चालवत कंपनीवर ७ कोटी रुपयांचा दंड आकारला आहे. ईडीकडून राजस्थान, पश्चिम बंगाल, गुजरात आणि दिल्ली अशा वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.
Agrasen Gehlot is the owner of a company named Anupam Krishi. Customs Department has prosecuted and levied a penalty of Rs 7 crores on his company. https://t.co/gwPtge4Mba
— ANI (@ANI) July 22, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.