HW Marathi
देश / विदेश

देशभरात रमजान ईदचा उत्साह

मुंबई | देशभरात आज रमजान ईद साजरी केली जात आहे.  इस्लामी कॅलेंडरनुसार रमजानचा महिना संपल्यानंतर ईद साजरी केली जाते. सऊदी अरबमध्ये काल (४ जून) ईद साजरी करण्यात आली. आज मुंबईसह देशभरात चंद्रदर्शन झाले. सायंकाळच्या सुमारास स्पष्ट चंद्रदर्शन घडले. दिल्लीच्या जामा मस्जिद मुस्लीम बांधवांनी सामूहिक नमाजपठण करून ईद साजरी केले.

कोलकाता, वाराणसी आणि आसामसहीत देशभरातील अनेक ठिकाणी ईदचा चंद्र पाहिला गेला. त्यामुळे रमजानचा महिना संपला आहे. रमजान काळातील रोजे (उपवास) ठेवल्यानंतर हा सण साजरा केला जातो. यावर्षी रमजानचा महिना ७ मे रोजी सुरु झाला असून ४ जून रोजी संपला. यादरम्यान मुस्लीम बांधवांनी एकूण २९ रोजे ठेवले.

रमजान हा इस्लामी कालगणनेनुसार ९ वा महिना आहे. चंद्र दर्शनानंतर दिवस व महिना बदलल्याने शव्वाल महिन्याच्या (१० व्या महिन्याच्या) पहिल्या दिवशी रमजान ईद साजरी केली जाते. ईदगाहमध्ये तसेच मशीदींमध्ये ईदची नमाज अदा करण्यात येते. मुंबईत आझाद मैदानात ही नमाज अदा करण्यात येणार आहे.

Related posts

पीएनबी घोटाळा नव्हे तर ‘या’ कारणासाठी मी देश सोडला !

News Desk

लवकरच रामदेवबाबांची जिन्सही बाजारात!

News Desk

जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये एका दहशतवाद्यांचा खात्मा

News Desk