HW Marathi
देश / विदेश

निवडणूक आयोगाने ‘नमो टीव्ही’वर लावलेली बंदी हटवली

नवी दिल्ली | नमो टीव्हीच्या प्रक्षेपणावर निवडणूक आयोगाने लावण्यात आलेली बंदी हटविण्यात आली आहे. यासाठी आयोगाने काही अटी आणि शर्तीवर नमो टीव्हीला प्रक्षेपणाला परवानगी दिली आहे. नमो टीव्हीवर फक्त लाईव्ह प्रक्षेपण करण्यास आयोगाने परवानगी दिली  असून कुठलेही रेकॉर्डेड प्रोग्राम या टेलिव्हीजनवरुन दाखवू नका, असे आयोगाने सांगितले.

निवडणूक आयोगाने राज्य मुख्य निवडणूक आयोगाला याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. नमो टीव्हीवर निवडणूक काळात फक्त लाईव्ह प्रोग्रामच प्रक्षेपित करता येतील, असे आयोगाने म्हटले आहे. प्री-रेकॉर्ड केलेले कुठलेही प्रोग्राम दाखविण्यास मनाई करण्यात आली आहे.

मीडिया कमिटीने प्रमाणपत्र दिल्याशिवाय नमो टीव्हीवरून कोणत्याही कार्यक्रमांचे प्रक्षेपण न करण्याची ताकीद दिल्लीच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी भाजपला दिली होती. तसेच या टीव्हीच्या कार्यक्रमांवर नजर ठेवण्यासाठी दोन अधिकाऱ्यांची नेमणूक देखली करण्यात आली आहे.

नमो टीव्ही हा नमो अ‍ॅपचा भाग असल्याचा खुलासा भाजपने निवडणूक आयोगाकडे केला होता. काँग्रेसने केलेल्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने याबाबतचा अहवाल मागविला होता. तसेच नमो टीव्हीवर प्रमाणपत्राशिवाय असलेला सर्व मजकूर तत्काळ हटविण्याचे देखील आदेश देण्यात आले होते.

Related posts

सहा जणांचे प्राण वाचवण्यासाठी अंशी जणांनी घातला जीव धोक्यात

News Desk

पाकिस्तानला जशास तसे उत्तर द्या | मोदी

अपर्णा गोतपागर

सरकारचा ‘फेक न्यूज’ संदर्भातील निर्णय मागे

News Desk