HW News Marathi
देश / विदेश

निवडणूक आयोगाने ‘नमो टीव्ही’वर लावलेली बंदी हटवली

नवी दिल्ली | नमो टीव्हीच्या प्रक्षेपणावर निवडणूक आयोगाने लावण्यात आलेली बंदी हटविण्यात आली आहे. यासाठी आयोगाने काही अटी आणि शर्तीवर नमो टीव्हीला प्रक्षेपणाला परवानगी दिली आहे. नमो टीव्हीवर फक्त लाईव्ह प्रक्षेपण करण्यास आयोगाने परवानगी दिली असून कुठलेही रेकॉर्डेड प्रोग्राम या टेलिव्हीजनवरुन दाखवू नका, असे आयोगाने सांगितले.

निवडणूक आयोगाने राज्य मुख्य निवडणूक आयोगाला याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. नमो टीव्हीवर निवडणूक काळात फक्त लाईव्ह प्रोग्रामच प्रक्षेपित करता येतील, असे आयोगाने म्हटले आहे. प्री-रेकॉर्ड केलेले कुठलेही प्रोग्राम दाखविण्यास मनाई करण्यात आली आहे.

मीडिया कमिटीने प्रमाणपत्र दिल्याशिवाय नमो टीव्हीवरून कोणत्याही कार्यक्रमांचे प्रक्षेपण न करण्याची ताकीद दिल्लीच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी भाजपला दिली होती. तसेच या टीव्हीच्या कार्यक्रमांवर नजर ठेवण्यासाठी दोन अधिकाऱ्यांची नेमणूक देखली करण्यात आली आहे.

नमो टीव्ही हा नमो अ‍ॅपचा भाग असल्याचा खुलासा भाजपने निवडणूक आयोगाकडे केला होता. काँग्रेसने केलेल्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने याबाबतचा अहवाल मागविला होता. तसेच नमो टीव्हीवर प्रमाणपत्राशिवाय असलेला सर्व मजकूर तत्काळ हटविण्याचे देखील आदेश देण्यात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्नाटकमध्ये क्रेन कोसळून सहा जणांचा जागीच मृत्यू

News Desk

पीटीआयचे सत्ता स्थपानेसाठी १५८ इतके संख्याबळ

swarit

चारित्र्यहनन करुन आरक्षणाच्या मुळ मुद्याला बगल देता येणार नाही- हार्दिक पटेल

News Desk