HW News Marathi
देश / विदेश

राज्यसभेच्या १९ जागांसाठी आज होणार निवडणूक

मुंबई | देशात आज राज्यसभेच्या १९ जागांसाठी निवडणूक होणार आहे. आज (१९ जून) होणारी राज्यसभेची निवडणूक ही ८ राज्यातील राज्यसभेच्या जागासाठी होणार आहे. यात मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान या तीन राज्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये राज्यसभेची लढाईही चुरसेची होणार आहे. याआधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १९ जागांवरील निवडणूक स्थगित करण्यात आली होती.

राज्यसभेच्या १९ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये प्रत्येकी ४, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी ३, झारखंडमध्ये २ आणि मणिपूर, मिझोरम व मेघालय येथील प्रत्येकी एका जागेवर निवडणूक होत आहे. मणिपूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. कारण सत्ताधारी भाजपची ९ आमदारांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता मणिपूरच्या एका जागेसाठी होणारी राज्यसभेची निवडणूक आता अधिक रंगदार होणार आहे.

राज्यसभेची निवडणूक आज सायंकाळी १९ जागांसाठी मतमोजणी होऊन विजयी आणि पराजय स्पष्ट होईल. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्ष्यात घेता सोशल डिस्टन्सिंगचे पालन व प्रत्येक उमेदवार आणि मतदाराचे थर्मल स्क्रीनिंग करुनच मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतीय महिलेचा पाकिस्तानात जबरदस्तीने विवाह

News Desk

‘जम्मू-काश्मीर भारताचे राज्य’, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची कबुली

News Desk

JNU मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीवरून वाद; काय आहे नेमके प्रकरण

Aprna