कोलकाता | पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला आज (२७ मार्च) सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगाल विधानसभेच्या एकूण २९४ जागांसाठी तब्बल ८ टप्प्यात निवडणुका होणार आहेत. त्यातल्या पहिल्या टप्प्यात ३० जागांसाठी मतदान होत आहे. तर शेवटच्या टप्प्याचं मतदान २९ एप्रिलला होणार आहे.
#WestBengalElections2021: Voting underway at booth number 67A in Patashpur assembly constituency, East Midnapore pic.twitter.com/pENvB8fq43
— ANI (@ANI) March 27, 2021
तर आसामच्या एकूण १२६ जागांसाठी तीन टप्प्यात निवडणुका होताहेत. त्यातल्या ४७ जागांचा पहिला टप्पा आज तर शेवटच्या टप्प्याचं मतदान ६ एप्रिलला होणार आहे. सध्या पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या विरोधात भाजपने सगळी ताकद पणाला लावली आहे.
Temperature of voters being checked, arrangement of masks, gloves, and hand sanitiser made at a primary school – designated as a polling booth – in Lahowal Assembly constituency of Dibrugarh.#AssamAssemblyPolls pic.twitter.com/VOaY0Q0lGl
— ANI (@ANI) March 27, 2021
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानात २१ महिलांसह १९१ उमेदवारांचे भवितव्य निश्चित होणार आहे. पहिल्या फेरीमध्ये पुरुलिया व झारग्राममधील सर्व मतदारसंघ तसेच बांकुरा, पूर्बा मेदिनीपूर आणि पश्चिम मेदिनीपूरमधील मतदारसंघात मतदान होणार आहे. दरम्यान, कोरोनाच्या नियमांचे पालन करत मतदान होत आहे. नागरिकांचे तापमान पाहणे, अंतर ठेवणे, या सगळ्या बाबी पाळल्या जात आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.