HW News Marathi
देश / विदेश

आज संपूर्ण भारत राममय, रोमांचित आणि भावुक झाला आहे !

नवी दिल्ली | अयोध्या श्रीराम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. यानंतर पंतप्रधानांनी जनतेला संबोधित केले. यावेळी आपल्या संबोधनाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान मोदींनी “जय सियाराम, सियावर रामचंद्र कि जय” अशा घोषणा दिल्या. “आज संपूर्ण भारत राममय, रोमांचित आणि भावुक झाला आहे. आपली शेकडो वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. संकटाच्या चक्रव्युहातून रामजन्मभूमी मुक्त झाली आहे. आता रामलल्लासाठी एका भव्य मंदिराचे निर्माण होईल. राम मंदिरासाठी शेकडो वर्षे, कित्येक पिढ्यांनी प्रयत्न केला आहे. आजचा हा दिवस त्यांच्याच या संकल्प आणि त्यागाचे प्रतीक आहे”, पंतप्रधान यावेळी म्हणाले.

श्रीराम आजही आमच्या मनात आहेत. हे राम मंदिर आपल्या संस्कृतीचे आधुनिकतेचे, आपल्या सामूहिक शक्तीचे, आपल्या राष्ट्रीय एकत्मकतेचे प्रतीक आहे. अयोध्येचे अर्थतंत्रही आता बदलणार आहे. यानिमित्ताने कित्येक संधी उपलब्ध होणार आहेत. राम मंदिराच्या आंदोलनात समर्पण, त्याग, संघर्ष, संकल्प होता. आज त्यांचे हे स्वप्न पूर्णत्वास जात आहे. मी त्या सर्वांना नमन करतो. शरयू नदीच्या काठावर सुवर्ण इतिहास लिहिला गेला आहे. या ऐतिहासिक क्षणाचा मी साक्षीदार आहे”, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

“ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांचे मावळे त्यांच्या स्वराज्याचे संरक्षक बनले. त्याचप्रमाणे, देशातील असंख्य लोकांच्या सहकार्याने, सहभागाने राममंदिर निर्माणाचे हे पुण्यकर्म घडले आहे. श्रीराम गेल्या अनेक वर्षांपासून भारताचे स्तंभ बनले आहेत. भारताची अध्यात्मिकता हा जगासाठी प्रेरणेचा विषय आहे. कोरोनामुळं अनेक मर्यादांचे पालन करुन हा कार्यक्रम होत आहे. प्रभूश्रीरामाच्या कार्यक्रमासाठी जी मर्यादा राखली गेली पाहिजे ती मर्यादा पूर्णपणे राखण्यात आली आहे. ही इतिहासाची पुनरावृत्ती आहे”, अशा भावना पंतप्रधान मोदींनी यावेळी व्यक्त केल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्यास होणार फाशी

News Desk

विस्तारवादाचं युग संपलं, हे युग विकासवादाचं आहे

News Desk

अखेर मोदी सरकारने जिंकला विश्वास

News Desk