HW News Marathi
देश / विदेश

महाशिवरात्री निमित्ताने देसभरात उत्साह

मुंबई | देशभरात महाशिवरात्री निमित्ताने सगळीकडे उत्साह दिसून आला आहे. मुंबईतही महाशिवरात्रीचा उत्साह पहायला मिळाला. मुंबईतल्या बाबूलनाथ या प्राचीन शिवमंदिरात पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. मुंबईतले हे अत्यंत प्राचीन आणि उंच शिवमंदिर आहे. इथल्या टेकडीवर बाभळीचे झाड होते आणि त्यावरून बाबूलनाथ असे नाव पडले.

अंबरनाथ शहरातील ९५८ वर्ष अशा अतिप्राचीन शिवमंदिरातही रात्री 12 वाजल्यापासूनच भाविकांची मोठी गर्द्दी पाहायला मिळतेय. महाशिवरात्रीनिमित्त इथे मोठी जत्रा भरते. अंबरनाथचे शिवमंदिर हे हेमाडपंथी असून शिलाहार राजा मुम्बानी याने ९५८ वर्षा पूर्वी बांधल्याचा इतिहास आहे. विशेष म्हणजे युनोस्कोने जाहीर केलेल्या भारतातील अतिप्राचीन पुरातन मंदिराच्या यादीत या शिवमंदिराची नोंद आहे. मध्यरात्री १२ वाजता शिवलिंगाला अभिषेक घालण्यात आल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.

आज देशभरातील बारा ज्योतिर्लिंग मंदिरांमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळते. महाशिवरात्रीनिमित्त भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणांना भेट देतात. यावेळी शिवलिंगावर जलाभिषेक आणि दुग्धाभिषेकही करण्यात येतो. तसेच बेलाची पाने देखील शिवलिंगावर अर्पण केली जातात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा १४, आणखी २ जणांना कोरोनाची लागण

Arati More

उर्जित पटेल यांच्याबाबत तुम्हाला या गोष्टी माहित आहेत का ?

News Desk

उर्जित पटेल गव्हर्नरपदाचा राजीनामा देणार ?

Gauri Tilekar