HW News Marathi
Covid-19

दिलासादायक : ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून कोविड-१९ च्या लसीबाबत एक आनंदाची बातमी

ब्रिटन | न दिसणाऱ्या कोरोनाच्या विषाणीनी संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. या वायरसवर प्रभावी औषध शोधण्यासाठी संपूर्ण जगातून प्रयत्न केले जात आहेत. ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठात ही लस तयार करण्याचे काम सुरु होते. त्यानंतर या लसीची मानवी चाचणी देखील करण्यास सुरुवात झाली होती. आणि आता या लसीने आणखी एक टप्पा यशस्वीरीत्या पार पाडला आहे. इंडीया टुडे या वृत्तपत्राने या बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

कुठल्याही नव्या आजाराशिवाय फुफ्फुसाचे नुकसान रोखण्यात “ChAdOx1 nCoV-19” लस परिणामकारक ठरली आहे. सहा माकडांना SARS-CoV-2 विषाणूचा डोस देण्यात आला होता. ज्या माकडांना कोरोनावरील ही लस देण्यात आली. त्यांना न्युमोनियाची बाधा झाली नाही असे डॉ. पेन्नी वॉर्ड यांनी सांगितले आहे. लंडनच्या किंग कॉलेजमध्ये ते प्राध्यापक आहेत. संशोधनामध्ये काही नकारात्मक गोष्टी समोर आल्या तर पुढे मानवी चाचणीमध्ये अडथळा निर्माण होतो. लवकरच या लसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या मानवी चाचण्या सुरु होणार आहेत.

भारतातील पुण्याची सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया ही संस्था ऑक्सफर्डच्या लस संशोधन प्रकल्पात भागीदार आहे. सुरुवातीच्या ६ महिन्यात ५० लाख डोस तयार केले जातील. त्यानंतर हे उत्पादन महिन्याला १ कोटी डोस इतके वाढवण्याची योजना आहे. सीरमने यापूर्वी मलेरियावरील लसीसाठीही ऑक्सफर्ड विद्यापीठाबरोबर सहकार्य केले होते. साधारण सप्टेंबर-ऑक्टोबपर्यंत ही लस बाजारात येईल पण त्यासाठी मानवी वैद्यकीय चाचण्या यशस्वी होणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, तुर्तास माकडांवर केलेल्या या प्रयोगाचे सकारात्मक रिपोर्ट आल्याने सगळ्यांनीच थोडा का होईना पण सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र शासनाचं लष्कराला पत्र ,अजित पवारांची माहिती ..

Arati More

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली कोरोनाची लस

News Desk

परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट लस, मुंबई महापालिकेची नियमावली जाहीर

News Desk