मुंबई | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या माध्यामातून राजकीय पक्ष प्रचार करतात. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी फेसबूककडून करण्यात आलेली ही पहिली कारवाई आहे. फेसबूकने काँग्रेसशी संबंधित ६८७ पेजेस आणि अकाऊंटस डिलीट केली आहेत. या पेजेस संदर्भात तक्रारी केल्यानंतर फेसबूककडून ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच पाकिस्तानी सैन्याच्या कर्मचाऱ्यांशी संबंधित १०३ फेसबुक अकाऊंटस डिलीट करण्यात आली आहेत.
Facebook: We removed 687 Facebook Pages & accounts-the majority of which had already been detected&suspended by our automated systems-that engaged in coordinated inauthentic behavior in India &were linked to individuals associated with an IT Cell of the Indian National Congress https://t.co/lWA2BJgUfg
— ANI (@ANI) April 1, 2019
काँग्रेसशी संबंधित या फेसबुक पेज आणि अकाऊंटवरून खोट्या बातम्या, खोटी माहिती प्रसारीत केली जात होती. त्यामुळे हे पेजेस हटविण्यात आल्याचं फेसबुकने म्हटले आहे. निवडणूक काळात खोट्या बातम्या पसरविणारे अकाउंट बंद करण्यात येणार असल्याचे फेसबुकने माहिती दिली आहे. फेसबुकच्या या कारवाईचा काँग्रेस बळी पडले आहे.
Snapshots of Congress IT Cell linked Facebook pages that were shut down today for spreading misinformation and “coordinated inauthentic behaviour in India” according to FB Head of Cybersecurity Nathaniel Gleicher pic.twitter.com/x90ekmO5ZN
— ANI (@ANI) April 1, 2019
काँग्रेसशी संबंधित या फेसबुक पेजेसची तपासणी करण्यात आली होती. खोटी अकाउंट तयार करून ही पेजेस तयार करण्यात आली होती आणि त्यावरून संबंधितांनी स्वत:चा अजेंडा राबवायला सुरुवात केली होती. या पोस्टमध्ये इतर राजकीय पक्षांवर टीका करण्यात येत होती, असे फेसबुकने म्हटले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.